देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प, खासदार धनंजय महाडिक


देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला  दिलासा देणारा अर्थसंकल्प, खासदार धनंजय महाडिक


कोल्हापूर १३ प्रमोद पाटील 

खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केलं. या अर्थसंकल्पामुळं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्यास चालना मिळेल. तसंच विकसित भारत संकल्पनेला गतीमान करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं खासदार महाडिक यांनी नमुद केलं. देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला मोठा दिलासा देणारा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचं सांगून, खासदार महाडिक यांनी विरोधकांचं फेक नॅरेटिव्ह खोडून काढलं.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करून जोरदार समर्थन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभागृह नेते जे.पी.नड्डा यांचा कृतज्ञतापुर्वक उल्लेख करून खासदार महाडिक यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार्‍या केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांचं अभिनंदन केलं. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचं सांगून विकसित भारत संकल्पनेला चालना देणारा आहे. तसंच २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरकडं नेण्यासाठी उपयुक्त आहे, असं खासदार महाडिक म्हणाले. कोव्हिड नंतर जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षात भारत सर्व क्षेत्रात वेगवान प्रगती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या टिकेचाही खासदार महाडिक यांनी समाचार घेतला. यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय जनतेला सर्वाधिक फायदा झाला असून, विरोधकांनी राजकारणासाठी देशातील जनतेची दिशाभूल करू नये, असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं. मोदी सरकारनं अर्थसंकल्पातून महसुलात १ लाख कोटी रुपयापर्यंतची सुट जाहीर केलीय. त्यातून शंभर कोटी भारतीयांचं जीवनमान उंचावेल, असं खासदार महाडिक म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पातील वैशिष्टय, त्याच्यातून विविध क्षेत्रांना होणारा लाभ याबद्दलही खासदार महाडिक यांनी आकडेवारीसह विश्लेषण केलं. केंद्र सरकारच्या विविध योजना, आत्मनिर्भर भारत संकल्पना, रोजगार निर्मिती, शेतकरी, महिला, तरूण यांच्यासाठी असलेल्या योजना याबद्दल खासदार महाडिक यांनी अभ्यासपूर्ण माहिती देत, यावर्षीचा देशाचा अर्थसंकल्प देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा तसंच त्यांची स्वप्न पूर्ण करणारा असल्याचं नमुद केलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.