सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सुवर्ण महोत्सव – विविध कार्यक्रमाचे आयोजन : माजी विद्यार्थ्याचा मेळावा
कोल्हापूर (गांधीनगर ) ७ प्रमोद पाटील
गांधीनगर येथील सिंधू एज्युकेशन सोसायटी आपल्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने "बॅक टू स्कूल" या भव्य पुनर्मिलन सोहळ्याचे आयोजन करत आहे. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे होणारा हा ऐतिहासिक सोहळा माजी विद्यार्थ्यांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारा, शिक्षण संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा सन्मान करणारा आणि समाजातील मान्यवरांना एकत्र आणणारा ठरणार आहे.
विविध कार्यक्रमाचे आयोजन
-
उद्घाटन समारंभ व प्रमुख पाहुण्यांची उपस्थितीअसणार आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. चंद्रकांत (दादा) पाटील (मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी
सन्माननीय उपस्थिती हसन मुश्रीफ (मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) - डॉ. राम जव्हारानी (चेअरमन, ग्लोबल सिंधी कौन्सिल आणि सहयोग फाऊंडेशन) ,आशा चंद (सह-संस्थापक, सिंधी संगीत, मुंबई/दुबई) ,कांचनताई परुळेकर (संचालक, स्वयंसिद्धा संस्था, कोल्हापूर) यांची उपस्थिती असणार आहे
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०० ते ११:३० – उद्घाटन समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन संध्याकाळी ५:०० ते ९:०० – सांस्कृतिक संध्याकाळ आणि विशेष परफॉर्मन्स होणार आहेत . तर
दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:०० ते ९:०० – सांस्कृतिक संध्याकाळ आणि विशेष परफॉर्मन्स होतील तर
संध्याकाळ- बॉलीवूड गायक: मधुर शर्मा - बॉलीवूड अभिनेत्री: अनुशा दांडेकर - बॉलीवूड अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन: डॉ. संकेत भोसले - आंतरराष्ट्रीय सिंधी गायिका आणि माजी विद्यार्थिनी: वंदना निरंकारी - ड्रमर टीम: गूंज - आंतरराष्ट्रीय डीजे: अंत्रिक्ष - इल्यूजनिस्ट आणि मेंटलिस्ट: आर्यन मंडलिक - अँकर: रोमा चांदभानानी - ऊर्जावान बँड: नितिक नागदा - फिटनेस आणि बॉलीवूड डान्स वर्कशॉप: आकांक्षा राय यांचे बाहरदार कार्यक्रम होणार आहेत .
यांसाठी आयोजन समिती चेसिंधू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. जी.एच. नरसिंघानी, व सेक्रेटरी नारुमल नरसिंघानी तसेच इव्हेंट चेअरमन श्री. शाम नोतानी ,इवेंट को-चेयरमेन श्री अमित कटार, व्यवस्थापन समिति चे साहिल दर्डा, अमित डेंबानी, सीए गिरीश पंजवानी, रवि निरंकारी, विजय दुल्हानी, विनोद नरसिंघानी तसेच कोर समिति चे सदस्य अमित जसूजा, विजय नागदेव, विनोद आहूजा, संजय नरसिंघानी, अमित निरंकारी, साहिल जसूजा, संतोष कुकरेजा व माहिला कोर सदस्य प्रमुख पूजा नोतानी, रश्मी सचदेव, सीमा चावला कुकरेजा, महेक निरंकारी, कीर्ति दुल्हानी, दीपिका लालवानी ख़ुबचंदानी, रेखा चावला भटेजा, स्नेहा खटवानी, प्रीति डेंबडा कटार, भक्ति चावला व मुस्कान खुबचंदानी यांनी या भव्य सोहळ्याचे नियोजन केले आहे. तर शाम बास रानी संयोजन समन्वयक आहेत .
या निमिताने समाजसेवा आणि शिक्षणाला हातभार:
सिंधू एज्युकेशन सोसायटी शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून उल्लेखनीय योगदान देत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केली जाणार आहे, ज्यासाठी अनेक दाते आणि उद्योगपती पुढे सरसावले आहेत. "शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि नव्या मित्रत्वाला गहिवरून जाण्यासाठी या सोहळ्याचा अविभाज्य भाग बना ' असे आहवान संयोजक समितीने केली आहे .



