करवीरच्या विकासाचा मानबिंदू म्हणजे स्व. दिग्विजय खानविलकर
कोल्हापूर १४ ( विशेष लेख - ॲड. अनिल घाटगे)
करवीर तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी 25 वषे करवीर तालुक्याची आमदारकी भूषविली. असे महाराष्ट्राचे माजी मंत्री *
कै. दिग्विजय खानविलकर यांची 15 फेब्रुवारी 2025 रोजी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्ताने साहेबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन ज्यांनी आपल्या समाजकार्याला सुरुवात केली आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी करवीर मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली1978 च्या पराभवानंतर 1980 पासून ते 2004 पर्यंत सलग 25 वर्ष आमदारकीच्या माध्यमातून करवीर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्या बरोबरच शहराच्या विकासास देखील हातभार लावला
कोल्हापूर कै.खा.उदयसिंगराव गायकवाड यांच्या माध्यमातून टी व्ही केंद्र सुरू केले अगदी पहिल्या आमदारकी पासूनच विमानतळासाठी प्रयत्न केले आजचे जे विमानतळ दिसते आहे त्याचा पाया छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर जर कोणी घातला असेल तर ते दिग्विजय खानविलकर यांनी 1984 ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केली 1985 ला काँग्रेसच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव मुंबईमध्ये साजरा करण्यात आला यावेळी जगभरातून मुंबईमध्ये उपस्थिती लावलेल्या *foreign delegates* यांची सर्व जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान *स्वर्गीय राजीव गांधी यांनी दिग्विजय खानविलकर यांच्यावर सोपवली होती आणि ती त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे बजावल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले होते नंतर 1993 ला कृषी आणि आरोग्य मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले त्यावेळेस कृषी महाविद्यालयामध्ये विविध अभ्यासक्रम सुरू केलेत्याचबरोबर आरोग्य मंत्री म्हणून सीपीआर च्या उभारणीचा पाया रचला जिल्ह्यातील युवकांना रोजगार मेळावा यासाठी अमित, नागरिका, युरीटेक्स, 100% अत्याधुनिक मिल एमआयडीसीत आणून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि अशा बऱ्याच इंडस्ट्रीज साहेबांच्या प्रयत्नामुळे तिन्ही एमआयडीसीमध्ये निर्माण झाल्या
महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेवर असताना सरकार विरोधात एक लाख लोकांचा मोर्चा काढून विविध प्रश्नांना वाचा फोडली आणि पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला 1999 ला काँग्रेस राष्ट्रवादी असे दोन पक्ष निर्माण झाले सर्वांनाच साहेब हे काँग्रेस बरोबर राहतील अशी अपेक्षा असताना अचानकपणे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पर्यायाने शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आम्ही त्या निर्णयाचे स्वागत केले अपेक्षेप्रमाणे साहेब पुन्हा प्रचंड मतांनी विजयी झाले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री हे पद त्यांना मिळाले* पूर्ण ताकदीनिशी कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्याचा बॅकलॉग साहेबांनी भरून काढण्याबरोबरच कोल्हापूर बरोबरच महाराष्ट्रात पाच मेडिकल कॉलेज उभा केली कोल्हापूर शहराचा रखडलेला विकास आराखडा मंजूर केला* विमानतळाला चालना दिली 5 स्टार एमआयडीसी अधिक सक्षम कशी होईल यासाठी मंडलिक साहेबांच्या बरोबर प्रयत्न केले कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती शाहू महाराजांचे नाव दिले सीपीआर मध्ये विविध विभाग सुरू केले* आज जे कोल्हापूर आरोग्य विभागामध्ये सक्षम दिसत आहे त्याला खानविलकर साहेबांचे खंदे नेतृत्व कारणीभूत आहे. विविध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा राहत आहेत
कोल्हापूर शहराला त्या काळात व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा यासाठी थेट पाईपलाईन पूर्वीची शिंगणापूर योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली म्हणून आज पर्यंत आपण पाणी पीत आहोत गैबी बोगदा पूर्ण करून स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न केला अशी अनेक कामे आपल्या कारकिर्दीत साहेबांनी करून ठेवली त्यामुळे आजही साहेबांचे नाव आदराने घेतले जाते साहेबांचे इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजराती भाषेवर प्रभुत्व होते
आजच्या जयंतीच्या निमित्ताने साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन



