शिवमुद्रा प्रतीष्ठानच्या वतीने पंचगंगा दिपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
कोल्हापूर १५ प्रमोद पाटील
शिवमुद्रा प्रतीष्ठान वतीने पंचगंगा नदीघाट परिसरात दिपोत्सव
गुरुवार दि. १४/११/२४ रात्री ८ पासुन जन-सहभागातुन कराओके चा गाण्यांच्या नवीन उपक्रमाला करवीर वासियांनी भरघोस प्रतिसाद दिला, मध्य रात्री पावसाने हजेरी लावल्याने कार्यक्रमात विघ्न येते की काय? असा प्रश्न आयोजकांना पडला गेली ४५ वर्ष हा उपक्रम पंचगंगा नदी घाटावर सुरू आहे काल पहिल्यांदाच त्रीपुरारी पोर्णिमेला दिपोत्सव असलेल्या दिवशी पाऊस पडल्याची चर्चा सर्वत्र होताना पहायला मिळाली. पण तासा भराने सगळं सुरळीत झाले व पुन्हा कार्यकर्ते व नागरिक उत्साहात दिपोत्सवाच्या तयारी ला लागले.
शुक्रवार दि. १५ पहाटे 3:30 वा.पंचगंगेची आरती करुण दिपोत्सवास सुरवात प्रमुख ऊपस्थीती राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक मा. श्री. सागर बगाडे सर ,मा.श्री. संदिप देसाई माजी भाजपा जिल्हाध्यक्ष,मा. श्री.प्रकाश गवंडी , माजी नगरसेवक..
दिपोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील विवीध संघटना आणि तरुण मंडळे यानीं वेगवेगळ्या सामाजीक विषयावर रेखाटलेल्या सुंदर रांगोळ्यांचे प्रदर्शन , प्राचीन मंदीरांवर विद्युत रोशनाई , श्री महेश हिरेमठ यांचा वाद्यव्रुदं बोचऱ्या थंडी रसिक प्रेक्षकांना सुखाऊन गेला तसेच भव्य आतशबाजी करत दिपोत्सव साजरा करण्यात आला .. व्हाईट आर्मी चे जवान यांचे अनमोल सहकार्य लाभले..
सहभागी कार्यकर्ते - शिवमुद्रा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दिपक देसाई , माजी उप महापौर दिगंबर फराकटे,राज कापसे ,निलेश जाधव ,अक्षय मिठारी , अवधुत कोळी , अविनाश साळोखे, विनोद हजारे, अतुल वस्ताद,रोहित गायकवाड,वैभव कवडे , राज पेंडुरकर ,डी जे मयुर,अक्षय मोरे, प्रविण चौगुले, तसेच कोल्हापूर शहरातील विविध संघटना तालीम संस्था आणि तरुण मंडळानी उस्फुर्तपणे दिपोत्सवात सहभाग घेतला.



