त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’! - हिंदु जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम!

 


त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’! - हिंदु जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम



कोल्हापूर १६ प्रमोद पाटील 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदू बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित केले गेले.यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात २० या ठिकाणी हा उपक्रम संपन्न झाला.

यात विशेषकरून महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शिरोली, नागाव, हलोंदि, अतीग्रे, मौजे,  वडगाव, पाचगाव, पेठवडगाव, इंगळी, साजणी, चोकाक, मलकापूर, गडींगलज, तसेच निपाणी, संकेश्वर (कर्नाकट) अशा गावात धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन नियोजन केले. मौजे वडगाव येथे मंदिराचे पुजारी श्री. वाखरेकर गुरुजी यांनी, अतीग्रे गावातील हिंदुत्वनिष्ठ श्री. कृष्णात पाटील यांनी, तर साजणी गावात बचतगटाच्या अध्यक्षा सौ. रोहिणी पाटील यांच्या पुढाकाराने समर्थ मंदिरात आणि मारुती मंदिरात हा उपक्रम पार पडला. पाचगाव येथे भाजपचे कार्यकर्ते श्री. सागर गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन भैरवनाथ मंदिरात आयोजन केले. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरातही हा उपक्रम राबवण्यात आला.


कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र यावे या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या हिंदू धर्मप्रेमींनी मंदिरे, घरी आदी ठिकाणी दीप प्रज्वलित करताना ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करताना हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. सोशल मीडियातही हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.