प्रति पंढरपूर नंदवाळ आषाढी वारी आणि नगरप्रदक्षिणा सोहळ्यात सर्वानी सहभागी व्हावे - हभप आनंदराव लाड महाराज

 प्रति पंढरपूर नंदवाळ आषाढी वारी आणि नगरप्रदक्षिणा सोहळ्यात सर्वानी सहभागी व्हावे - हभप आनंदराव लाड महाराज 

                


कोल्हापूर - २७ प्रमोद पाटील 

  सलग २१ वर्ष सुरु असलेल्या कोल्हापूर ते पौराणिक संदर्भ असलेल्या  प्रति पंढरपूर नंदवाळ या आषाढी वारी दिनी १७ जुलै रोजी आणि पूर्व संध्येला १६ जुलै रोजी नगर प्रदक्षिणा सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे आहवान दिंडी प्रमुख हभप आनंदराव लाड महाराज यांनी केले . मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येथे श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्ट वतीने आयोजित आषाढी वारीच्या पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते .

प्रारंभी सर्वांची स्वागत करताना सचिव दीपक गौड यांनी 'यंदा माऊलींच्या आषाढी वारीमध्ये होणार चांदीच्या रथाचे राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून साकारला जात आहे  .यंदा वारीचे 21 वे वर्ष असून वारीमध्ये यंदा माऊलींचा रथ चांदीचा  करण्याचा संकल्प राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय राजेश   क्षीरसागर व ट्रस्टच्या संयोजक कमिटीने घेतला आहे . यंदाच्या वारीमध्ये संपूर्ण सागवानी रथ तयार असून त्यावर  चांदी कलाकुसरीचे  काम सुरू आहे , राधानगरी तालुक्यातील तारळे  गावातून हा रथ गावोगावी स्वागत करत लवकरच कोल्हापुरात येणार असल्याची माहिती त्यांनी  दिली .  यावेळी संयोजन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुळचे डॉक्टर एम पी पाटील यांना सन्माननीय पी एच डी मिळाले  बद्दल तसेच महालक्ष्मी बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड .राजेंद्र किंकर आणि गेली 21 वर्षे सलगपणे दिंडी प्रमुखांसाठी फेटे भेट सेवा देणारे विष्णुपंत पवार यांना भगवी शाल आणि श्रीफळ देऊन संयोजन समिती संयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .

 समिती अध्यक्ष बाळासाहेब पोवार - राजेंद्र मुकुटे यांनी विविध शाळा महाविद्यालयातून या दोन्ही सोहळ्यामध्ये मूल्य शिक्षणांतर्गत सहभागी व्हावे यासाठी विनंती पत्रे पाठवण्याची सूचना केली तर, काडगांव चे  सखाराम चव्हाण ( बापू )यांनीवेळेत पुईखडी रिंगण सोहळा वेळेवर पार पाडावा अशी सूचना केली . सर्व संयोजक संचालकांना समन्वयासाठी ओळखपत्रे देण्याची सूचना ॲड . राजेंद्र यांनी केली ' संभाजी पाटील , चोपदार भगवान तिवले , काडगांव  चे बाळासो गुरव भगवान  चरणे घोडे माऊली अश्व सेवा देणारे संतोष रांगोळी सुरज मोरे सुनील पाटील तसेच बैलगाडी सेवा पुरवणारे कांड

गाव चे सखाराम चव्हाण संभाजी पाटील तसेच साहेबराव काशीद आदींनी यावेळी सूचना केल्या . विश्व हिंदू  परिषदेचा ही यामध्ये सेवा कार्यात सहभागी असेल असे कुंदन पाटील आणि ॲड . सुधीर वंदूरकर जोशी यांनी कळविले आहे . या पूर्वनियोजन बैठकीस डी डी पाटील मोहन चोरगे हुपरी , कांडगांव , रांगोळी तील वारकरी सह  संयोजक श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळ मंगळवार पेठ यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.