ई पॅसेंजर व ई कार्गो या रिक्षांचे कदम बजाज मध्ये अनावरण आणि नवीन शोरूमचे उद्घाटन

 ई पॅसेंजर व ई कार्गो या रिक्षांचे कदम बजाज मध्ये अनावरण आणि नवीन शोरूमचे उद्घाटन




कोल्हापूर २८ प्रमोद पाटील 

सध्याचे वाढते प्रदुषण आणि वाढती वाहन संख्या पाहता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोणाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आर ई पॅसेंजर व ई कार्गो  या रिक्षांचे अनावरण आणि पश्चिम महाराष्टातील कदम बजाज या सर्वात मोठ्या शोरूमचे उद्‌द्घाटन वारणा सहकारी बँकेचे चेअरमन मा. निपुण कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या नविन शोरूममध्ये विक्री, विक्री पश्वात सेवा, इंश्युरन्स, फायनान्स, आणि अनुभवी मेकॅनिकसह सर्वात मोठे हायटेक वर्कशॉप उपलब्ध करून देण्यात आले आहे.



यावेळी परवान्याची गरज नसलेल्या व अल्पखर्चात चालणा-या या इलेक्ट्रीक रिक्षांचे वितरण करण्यात आले. यावेळी बजाज कमर्शियल व्हेईकल सेल्स व्हाईस प्रेसिडेंट मा. सुरेश कुटटन , रिजनल सेल्स मॅनेजर नितेश भांटीया , रिजनल सर्व्हिस मॅनेजर मा. विशाल जैन , एरिया सेल्स मॅनेजर मा. अजय प्रताप , मा. अभिनव राज, कदम बजाज चे संचालक मा. निलेश कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

      वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने इलेक्ट्रिक व्हेईकल सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. पेट्रोल, डिजेलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत असताना पैशाची बचत म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकलला नागरिकांची देखील पसंती मिळत आहे.

बजाज ई रिक्षांचे खास वैशिष्ये म्हणजे यात मोठी बॅटरी, ऑन बोर्ड चार्जर, २ स्पीड ऑटोमॅटिक ट्न्समिशन, अँडव्हान्स पी एम सी मोटर, मोठे ट्युबलेस रेडियल टायर, ड्राइव्ह शाफ्ट अशी आहेत.

       बजाज आर ई पॅसेंजर रिक्षा एका चार्जमध्ये १७८ किमी. पर्यंत चालते. तर दुसरी मालवाहू असलेली ई कार्गो १८० किमी. पर्यंत चालते. एका चार्जसाठी १०रू. खर्च येतो. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत ही सर्वांना परवडणारी व बचत करणारी रिक्षा ठरत आहे. रिक्षासाठी ५ वर्षाची वॉरंटी आणि ७३,०००/- रु. पर्यंत गव्हमेंट सबसिडी मिळणार आहे.

       कोल्हापूरातील कदम बजाज यांनी उदयम सोसायटी वेटब्रिज, उदयमनगर, कोल्हापूर येथिल नविन शोरूमध्ये ई पॅसेंजर व ई कार्गो आहे विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. विजय कृष्णा जाधव, अक्रम मुजावर, विदयाधर काकडे या तीन प्रथम ग्राहकांना आज इलेक्ट्रिक रिक्षावे वितरण करण्यात आले असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कदम बजाजचे संचालक निलेश कदम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.