छ. शाहूंनी बहुजनांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले - प्रा. आनंद भोजने

 छ. शाहूंनी बहुजनांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले - प्रा. आनंद भोजने



कोल्हापूर, दि. २६ प्रमोद पाटील 

  शिक्षण हे समाज सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे ओळखून शाहू महाराजांनी तात्कालीन परिस्थितीत देखील बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार दिला. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा व निरक्षरतेचे प्रमाण वाढले होते. परंतु, शाहू महाराजांनी १९१६ साली सक्तीचे मोफत शिक्षणाचा कायदा पास करून तो कोल्हापूर संस्थानात लागू केला. शिक्षणात स्पृश्य व अस्पृश्य असा भेदभाव न करता, सर्वांना समानतेचे शिक्षण मिळावे यासाठी शाहू महाराजांनी सक्त ताकीद देऊन एकूण महसूलाचा ६ टक्के खर्च शिक्षणावर केला असे मनोगत प्रा. भोजने यांनी व्यक्त केले.

परिवर्तन फाउंडेशन तर्फे आयोजित शाहू जयंती प्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीस छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी सिव्हिल सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख, एक्साइजचे सचिन लोंढे, विरेंद्र भोपळे, रामदास पोवार, नितिन कदम, विद्याश्री पाटील, आदित्य कुंभार, इंद्रजीत पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच कराओके स्पर्धेकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी अँटी करप्शन चे डी.वाय.एस.पी. सरदार नाळे, एम .आय.डी.सी. चे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक, बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी, परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, डॉ. प्राजक्ता निवास सूर्यवंशी, राज कुरणे , बाळासाहेब घुणकीकर, रवींद्र कुरणे  आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.