कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी : प्रसाद संकपाळ

 कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी : प्रसाद संकपाळ



कोल्‍हापूर १० प्रमोद पाटील 


कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी असे प्रतिपादन आपत्ति  व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज केले. 90.4 मँगो एफ एम, युनिसेफ आणि स्‍मार्ट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित पाणी बचत काळाची गरज या जलसंवर्धन विषयी कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोल्‍हापूर सारख्या ठिकाणी पाणी बचतीची गरज आहे काय असा काही जणांना प्रश्न पडेल. मात्र आज मुबलक स्‍वरूपात पाणी उपलब्ध असले तरी भविष्यात कोल्‍हापूर सारख्या शहरांना सुध्दा पाणी बचत व सवंर्धन करणेचे गरजेचे होईल अशी चिंता व्‍यक्‍त करीत आज पाणी बचतीसाठी केलेली ही सुरूवात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी असे त्‍यांनी स्पष्ट केले.



पर्यावरण संरक्षक अनिल चौगुले यांनी कोल्‍हापूरात आज जरी पाणी टंचाई नसली तरी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी आजपासूनच कामाला लागणे गरजेचे असल्‍याचे यावेळी बाेलतांना नमूद केले.

युनिसेफचे कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे समन्‍वयक आदित्‍य जाधव यांनी पाणी बचत ही काळाची गरज असून त्‍यासाठी व्‍हाय वेस्‍ट हे ॲपच्‍या माध्यमातून युवकांनी पाणी बचतीचा मार्ग धरावा व इतरांना त्‍याची माहिती देवून देशकार्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी केले.




प्रा. वंदना यांनी पाणी व्‍यवस्‍थापन करून त्‍याचे संर्वधन हे शहरी भागात निश्चितच झाले पाहिजे नाहीतर भविष्यात आपणास मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी भिती त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

एक नागरिक म्‍हणून येथे जमलेल्‍या प्रत्‍येकाला पाणी समस्‍येबाबत जागृकता आहे. पाणी प्रदूषण, पाण्याचा चुकीचा वापर व पाण्याचा अति वापर या तिन्‍ही गोष्टींकडे प्रत्‍येक नागरिकानी गांभिर्याने पाहिले पाहिजे. घरगुती व व्‍यावसायिक किवा इंडस्‍ट्रीयल वापर करताना त्‍याचे प्रदुषण होणार नाही याची प्रत्‍यकांने काळजी घ्यावी असे शिवाजी विद्यापीठाच्‍या पर्यावरण विभागाच्‍या प्रमुख डॉ.आसावरी जाधव यांनी या कार्यक्रमात आपले मत व्यक्‍त करतांना सांगितले.

बी न्‍यजचे वृत्‍तसंपादक विजय कुंभार यांनी पाणी बचत व संर्वधानाबरोबरच योग्‍य प्रकारची वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्‍याचे यावेळी स्‍पष्ट केले. 

डॉ.संदीप पाटील यांनी शहरात प्रत्‍येकाचे घरात बोरींग असून त्‍याला मुबलक पाणीसाठा आहे मात्र रेन वॉटर हार्वस्‍टींग सारख्या उपाययोजना न करतस जलसंवर्धानाकडे दुर्लक्ष केल्‍यास त्‍याचे द्षपरिणाम आपणास भेडसावतील असे मत व्‍यक्‍त केले.

या कार्यक्रमात व्‍हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्रा.बी.जी.मांगले, माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी आपली मते व्‍यक्‍त केली.

यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, किशोर घाडगे, अंकुश निपाणीकर, सुमित साटम, ॲड.शिवाजी चौगुले, अनिता काळे, पल्लवी देसाई, प्रशांत शेंडे, सतिश वडणगेकर, अल्लाउद्दीन बागवान, संदीप संकपाळ, अमरसिंह पाटील, अनिल निगडे यांच्‍यासह अन्‍य मान्यवर उपस्‍थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र मकोटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.