कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित केलेले ज्योतिष संमेलन उत्साहात संपन्न

 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित केलेले ज्योतिष संमेलन उत्साहात संपन्न 



कोल्हापूर ९ प्रमोद पाटील 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथमच आयोजित ज्योतिष्य संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला विलासराव जाधव यांचे उज्वल ज्योतिष्य मार्गदर्शन केंद्र वेदिया ग्राफिक्स अखिल भारत हिंदू महासभा व वैदिक सनातनी ट्रस्ट  यानी आयोजन करण्यात आले होते 



कार्यक्रमाचे शुभप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्योतिष आचार्य विलासराव जाधव यांनी आपल्या भाषणांनी सुरुवात केली त्यांनी सांगितले की ज्योतिष शास्त्रामध्ये प्रमुख 12 घरे असतात या बारा स्थानामध्ये आपण जन्मलो त्यावेळी चे नातेवाईक मित्रपरिवार तसेच पै पाहुणे यांची सुद्धा या कुंडलीमध्ये प्रभावशील स्थान असते त्यामुळे सासूची सेवा किंवा मित्राची सेवा केल्याने सुद्धा एखादा नवग्रह पैकी एक ग्रह दूषित असेल तर तो सुधारतो असा शास्त्र सिद्धांत आहे त्यामुळे मरेपर्यंत आपण सर्व ओळखीचे  पाहुणे मित्रपरिवार यांना  न दुःखवता जीवन सुधारण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयानंद पाटील यांनी सांगितले की माणसाच्या जीवनामध्ये नवग्रहांचे शास्त्रोक्त व विधीयुक्त असे स्थान आहे जर माणूस जन्माच्या वेळी त्याचे ग्रह मरेपर्यंत ती फळ देत नाहीत हा सिद्धांत आहे कारण त्या जन्मणाऱ्या बाळाचा वजन सहा पौंड असते मग आयुष्यभर ते बाळ सहा  पौंड चे राहत नाही मग ते नक्षत्र किंवा ग्रह त्याला वाईट फळे चांगली फळ  कसे देईल नक्षत्रही चंद्रभागापासून वीस तासापर्यंत 26 तासापर्यंत कार्यरत असतात मग वीस वर्षाची दशा चंद्राची दशा किंवा नवग्रहापैकी अन्य कोणत्याही ग्रहाची दशा कशी फळे देईल हे प्रश्नचिन्ह आहेत दशा या काल्पनिक असून कोणतीही दशा कालावधीमध्ये घडत नाही त्यामुळे ग्रह हा नक्षत्र स्वामींची फळे देतो हा सिद्धांत आहे कृष्णमूर्ती ज्योतिष शास्त्र हे सांख्यिकीशास्त्र आहे १६×१६  भागीले  १० महिने असे सांख्यिकी आहे 

नाशिकहून आलेले मनिष शास्त्री गोसावी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की  नवीन ज्योतिषा नी कोणाच्याही कुंडलीत त्या कुंडलीचे दोष काढत बसू नये.

2) जगात कोणाचीही कुंडली परिपूर्ण नाही अगदी देवादीकांच्या देखील कुंडल्या परिपूर्ण नाही 

3) कोणताही यजमान आपणास आपल्या कुंडलीतील दोष काढण्याचे पैसे देत नाही    4) गोचर भ्रमण आणि दशा यांचा विचार करून शक्यतो त्या समस्या चें निवांरण करावे

कार्यक्रमाचे शेवटी लाटकर पंचांग  कर्ते संस्थापक मेघ शाम लाटकर यांनी सांगितले की गेली तीन तपे लाटकर पंचांग हे ज्योतिष शास्त्र प्रमाणे कार्यरत आहे देशभरातून ज्योतिष्य बंधू-भगिनी यांचे मार्गदर्शनामुळे लाटकर पंचांग आपणास ज्योतिष्य विषयक गुरु ग्रंथ म्हणून पाहिला जातो याचा मला सार्थ अभिमान आहे तुम्हा सर्व ज्योतिष्य बंधू-भगिनींचे मी आभार कृतज्ञ आहे 

किनी वाठारचे विजय गुरव यांनी आभार मानले संगीता राणे यांनी सूत्रसंचालन केले

यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाचे प्रमुख नियोजित शारदा खाडे.   वेदीया ग्राफिक्स.चे  शरद ठाणेकर अखिल भारत हिंदू महासभा संदीप सासने वैदिक सनातन ट्रस्टचे अविनाश शेलार सरनोबत तसेच उज्वल ज्योतिष्य मार्गदर्शन केंद्राचे विलासराव जाधव अखिल भारत हिंदू महासभा महिला अध्यक्ष शोभाताई शेलार उपजिल्हाध्यक्ष शीलाताई माने संदीप कुंभार. अभिजीत पाटील. तात्या शिराळकर राम कोरवी  आधी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.