क्रीडा पंढरी कोल्हापूर मध्ये प्रथमच क्रीडा कुंभमेळयाचे आयोजन : खासदार महोत्सव अंतर्गत शालेय खेळाडूंना मिळणार सुवर्णसंधी

 क्रीडा पंढरी कोल्हापूर मध्ये प्रथमच क्रीडा कुंभमेळयाचे आयोजन : खासदार महोत्सव अंतर्गत शालेय खेळाडूंना मिळणार सुवर्णसंधी





कोल्हापूर ०२ प्रमोद पाटील 

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून क्रीडा पंढरी असलेल्या कोल्हापूरात खासदार महोत्सव अंतर्गत क्रीडा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर, हे ब्रीदवाक्य घेऊन, दिनांक १० डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार आहे. त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळेल. शिवाय त्यांच्या कौशल्याला मानाचे व्यासपीठ मिळणार आहे. या क्रीडा महोत्सवात पारंपारिक मैदानी खेळ, देशी-विदेशी क्रीडा प्रकार, बौद्धिक क्रीडा कसरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. ज्युदो, वूशु, कराटे, बॉक्सिंग, फेन्सिंग, मल्लखांब, तायक्वांदो, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक, धर्नुविद्या, कुराश अशा वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा होतील. तर हॉकी, बास्केटबॉल, टर्फ फुटबॉल, रग्बी अशा सांघिक खेळांचा या क्रीडा कुंभमेळयात समावेश आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक आणि धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी कृष्णराज महाडिक यांची उपस्थिती होती.

जाहिरातीसाठी संपर्क 9326262323

शिवाय ग्रामीण भागाशी सांस्कृतिक नाळ जोडणार्‍या लोकप्रिय अशा लेझीम, चिखलगुठा, लावणी महोत्सव आणि हास्य जत्रा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत. तसेच शालेय राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स व दहावी राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. कळे, गारगोटी आणि गडहिंग्लज मध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जातील. तर शहर विभागामध्ये राजमाता जिजाऊ सभागृह, शिवाजी विद्यापीठातील क्रीडा संकूल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर, विवेकानंद महाविद्यालय सभागृह, भीमा हेल्थ झोन टाकाळा, कोल्हापूर अशा ठिकाणी स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर जिल्हयाच्या ग्रामीण भागात पणुत्रे-कळे, कडगाव गारगोटी-भुदरगड, गडहिंग्लज अशा विविध ठिकाणी कार्यक्रम स्थळ निश्चित करण्यात आले आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा स्त्री व पुरूष गटामध्ये क्रीडा स्पर्धा होणार आहेत. खासदार महोत्सवांतर्गत होणार्‍या क्रीडा कुंभमेळयात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी उमेश पाटील यांच्याशी ९८ ६० ६६ ९७ ४९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी केले आहे. या क्रिडा महोत्सवासाठी एक  विशेष आयोजन समिती तयार केली असून, त्यामध्ये अविनाश पाटील, संदीप लाड, मनोज घाटगे,  विशाल पाटील, शैलेश दास, सुरज खेबुडकर, दिपक पाटील, संदीप खोत, संतोष बाबर, प्रफुल्ल धुमाळ, भरत चौगुले, मनिष मारूलकर, सुरेश चव्हाण, प्रदीप साळोखे, सागर जाधव, विकास पाटील, नंदकुमार शिंदे, हृदयनाथ चव्हाण यांचा समावेश आहे.

सदरच्या क्रीडा कुंभमेळयाचे तपशिलवार वेळापत्रक सोबत जोडले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.