युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी ऋतुराज क्षीरसागर

 युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र  विभागीय सचिव पदी ऋतुराज क्षीरसागर



 कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी.

कोल्हापूर 1 (प्रमोद पाटील) 

 शिवसेनेच्या युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी श्री ऋतुराज राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी ही निवड जाहीर केली.


 कोल्हापूर जिल्ह्यात युवकांचे प्रश्न मांडणाऱ्या, सामाजिक कार्यातून युवकांचे नेतृत्व बनलेल्या  श्री ऋतुराज क्षीरसागर यांची निवड झाली आहे.

सध्या ऋतुराज क्षीरसागर हे कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या युवासेना अध्यक्ष पदी कार्यरत असून, गेल्या काही महिन्यात या दोन्ही लोकसभा मतदार संघात त्यांनी युवा सैनिकांची मोट बांधली आहे. 


 ऋतुराज हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुत्र असून गेली बारा वर्षे युवासेना, नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून ते युवकांचे नेतृत्व करत आहेत. 

 विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्चा,  रोजगारांचे प्रश्न यासह शाळा महाविद्यालयातील आरोग्य शिबिरे, मैत्री युवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून  कार्यरत आहेत.

 पश्चिम महाराष्ट्र सचिव या नात्याने त्यांच्यावरती आता पुणे, सांगली,सातारा,सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांची युवा सेनेची जबाबदारी असणार आहे.


 दरम्यान गेली ३७ वर्षे क्षीरसागर कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे.

 पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पश्चिम महाराष्ट्रातील युवा सेना संघटना वाढीची जबाबदारी वर्तपणे पार पाडून युवकांचे जाळे निर्माण करून शिवसेना युवा सेनेचे प्राबल्य वाढवणार असल्याचे ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.