" विज्ञान हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे त्याचा वापर मानवाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे " : जिल्हापरिषद उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे

 " विज्ञान हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे त्याचा वापर मानवाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे " : जिल्हापरिषद  उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे 





कोल्हापूर दि.१३ प्रमोद पाटील 

" विज्ञान हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे त्याचा वापर मानवाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे " असे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी केले.जिल्हा परिषद व मनपा प्राथमिक शिक्षण समिती शिक्षण विभाग यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव होते.



       दिगंबर मोरे म्हणाले , " आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींबाबत का ? कसे ? कशामुळे ?  केव्हा ? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारल्यास व त्या मागील कारण शोधल्यास  त्यांना निश्चितच विज्ञान व त्याचा कार्यकारण भाव समजेल. "

     "  विज्ञानामुळेच अनेक भौतिक सुविधांची निर्मिती झाली असून योग्य कारणांसाठी व योग्य प्रमाणात या साधनांचा मानवाने वापर करायला हवा " असे मत प्रशासनाधिकारी एस के यादव यांनी अध्यक्ष भाषणात बोलताना व्यक्त केले. व बक्षीस वितरण केले

        विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले बद्दल शैक्षणिक पर्यवेक्षक व विज्ञान प्रदर्शन प्रमुख बाळासाहेब कांबळे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी न्यू हायस्कूल मराठी शाखेचे मुख्याध्यापक शशिकांत तांदळे ,  सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील दत्तात्रय तळप , विलास पोवार , राजेंद्र कोरे ,प्रकाश सुतार सुशील जाधव , सुभाष मराठे , शिवाजी भोसले , दस्तगीर मुजावर , सुहास सुतार , शांताराम सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले.

       कार्यक्रमास शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी , उषा सरदेसाई यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.डॉ. स्वाती खाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दत्तात्रय तळप यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.