रॅली ऑफ हिमालय या साडेसहाशे किलोमीटरच्या स्पर्धेत योगेश कागले चे दखलपात्र यश - पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच सहभाग

 रॅली ऑफ हिमालय या साडेसहाशे किलोमीटरच्या स्पर्धेत योगेश कागले चे दखलपात्र यश - पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच सहभाग 



कोल्हापूर १४ प्रमोद पाटील 

 साडेसहाशे किलोमीटर च्या चार दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानांकीत बाईक रायडींग क्षेत्रातील प्रतिष्ठेची रॅली हिमालय एक्स्ट्रीम मोटर्स स्पोर्ट्स आणि द फेडरेशन मोटो स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, एफ आय एम यांच्या वतीने घेण्यात आलेली इंटरनॅशनल दर्जाची रॅली कोल्हापुराच्या योगेश चंद्रकांत कागले या रायडरने पहिल्यांदाच रॅली ऑफ हिमालया मध्ये भाग घेऊन ती पूर्ण केली त्यांच्या कॅटेगरीमध्ये 5 वां Group C catagory 160cc-210ccआणि ओव्हर ऑल 32 वे मानांकन मिळवले .विशेष म्हणजे या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून सहभागी होणारे कागले हे पहिलेच रायडर ठरले आहेत .

फक्त ४९९/- ३० दिवस जाहिरात प्रसिद्ध kolhapur online वर 

संपर्क ९३२६२६२३२३


या भारतातील सगळ्यात मोठी क्रॉस कंट्री रॅली रेस होते ही रेस मनाली सिसू पासून चालू होऊन स्पिती काझा देमुल लोसार ग्रांफु अशा ठिकाणी जाऊन परत मणाली येथे संपते पूर्ण ऑफरोडींग खडकाळ रस्ते बर्फाचे रस्ते नद्या क्रॉस करणे अशा पद्धतीचे भरपूर चॅलेंजेस असतात समुद्रसपाटीपासून सोळा हजार फुट उंचीच्या या दर्या खोऱ्यातील रस्त्यांवरून ही क्रॉस कंट्री रेस होते . सुमारे साडेसहाशे किलोमीटरची ही रेस स्पर्धा सलग चार दिवस चालू असते .या रॅलीसाठी योगेशला डिवोय ऑईल (divyol oil ) बॅरल (barrel exhaust ) या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभले .

याचबरोबर यासाठी गाडी तयार करण्यासाठी कोल्हापुरातील वैभव ऑटो क्लिनिक वैभव अस्वले यांनी गाडी तयार केली सोबत आकाश सातपुते स्वागत कांडेकरी विक्रांत राऊत यशोधन जाधव ओंकार बुधले यांचे सहकार्य लाभले . या योगेश कागले यांच्या यशाने कोल्हापूरच्या बाईक रायडर चे आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्येही दखलपात्र कामगिरी झाली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.