शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक आझाद मैदानावर जाणार : श्री.राजेश क्षीरसागर

 शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक आझाद मैदानावर जाणार : श्री.राजेश क्षीरसागर



कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार


कोल्हापूर दि.२२ प्रतिनिधी

 शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. प्रंसगी गुन्हे अंगावर घेवून आयुष्यभर कॉंग्रेसला विरोध केला पण, तीच शिवसेना कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या विचारांवर चालू लागली आणि कडवट शिवसैनिकांना पदोपदी होणारा अवमान सहन न झाल्यानेच शिवसेनेत उठाव झाला. या उठावाचे सूत्रधार मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंनद दिघे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत असून, टीकेला उत्तर न देता महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून शिवसेना काम करत आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्याची उन्नती आणि सर्वांगीण विकास हेच धोरण शिवसेनेचं असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा खरा वारसा जपणारे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  मुंबईतील आझाद मैदानवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.

मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  मुंबईतील आझाद मैदानवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनासंदर्भात कोल्हापूर जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पार पडली.


            यावेळी बोलताना महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या मागे उभी असून, शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्ववादी विचारांचे सोने शिवसेनेच्या आझाद मेळाव्यातच वाटले जाणार आहे. त्यामुळे दसरा मेळावा यशस्वी होईल. याकरिता जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांनी जोमाने तयारीला लागावे, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनेच्या संघटना बांधणी बाबतीत मुंबई, ठाणे यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. मुंबई झालेल्या शिवसेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीचे कौतुक करण्यात आले. याच पद्धतीने आगामी काळातही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची ताकत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून देवू, असे प्रतिपादन केले. 

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेनेस इतिहास आहे. ६ मे १९८६ च्या शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून रात्रंदिवस काम करून शिवसेना वाढविली. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीतून जनतेला न्याय देणाचे काम केले. शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती कि कॉंग्रेस - राष्ट्रवादी शी कदापि युती नाही परंतु कॉंग्रेस - राष्ट्रवादीशी युतीची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतल्याने अनेक कडवट शिवसैनिकांमध्ये घुसमट होती. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची शिवसेनेची वाताहत होत असताना मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परिवर्तनाची लाट आणली आणि राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि कडवट शिवसैनिकांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा दिला. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गतवर्षी झालेल्या दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. राज्यभरातील लाखो शिवसैनिक मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि शिवसेना वाढीसाठी एकत्र आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसार मार्गक्रमण करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस पाठबळ दिले आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा विजयोत्सव असून, आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्यास कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १० हजार शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहतील, असे सांगितले.


            यावेळी पिरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभांगी मिठारी यांचा सत्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, मा.नगरसेवक राजू हुंबे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उदय भोसले, प्रा.शिवाजीराव पाटील, समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहर अधिकारी नम्रता भोसले, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश पोवार, समन्वयक विक्रम पोवार, शहरप्रमुख राजू पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.