दैवज्ञ बोर्डिंग येथे दुर्गादेवीची महाअष्टमीनिमित्त महापूजा


दैवज्ञ बोर्डिंग येथे दुर्गादेवीची महाअष्टमीनिमित्त महापूजा



कोल्हापूर, ता. २१ प्रतिनिधी 

दैवज्ञ बोर्डिंग येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गादेवीची उद्या महाअष्टमीनिमित्त महापूजा आयोजित केली आहे. या पूजेला समाजबांधवांसह सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बिश्वजित प्रामाणिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.  


गेल्या २३ वर्षांपासून येथील दैवज्ञ बोर्डिंग येथे मंडळाच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गुजरी येथे कारागीर करणाऱ्या बंगाली कामगारांच्या वतीने उत्सव आयोजित केला जातो. कोलकत्याहून आणलेली माती आणि कलाकारांनी तयार केलेली व इको फ्रेंडली असणारी महिषासूर मर्दिनी रूपातील दुर्गेची ही मूर्ती महादेव, लक्ष्मी, सरस्वती, कार्तिक, गणेश अशी परिपूर्ण आहे. उत्सवाची सुरवात ललिता पंचमीला झाली.


दरम्यान, उद्या, अष्टमीनिमित्त सकाळी नऊ वाजता पूजा सुरू होईल. यामध्ये अकरा वाजता पुष्पांजली, दुपारी एक वाजता भोग चढवणे, दोनला कुमारी पूजन, चार वाजता संधी पूजन (महाकाली पूजन) आणि आठ वाजता आरती होईल. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांसह सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, देबाशीष डेनरिया, सचिव संदीप मंडल, आशीष मंडल, खजानिस गौरव भुनिया, इंद्रजित सामंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.