आजची पूजा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रुपात




आजची पूजा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची  महिषासुरमर्दिनी रुपात 




कोल्हापूर २२ प्रतिनिधी

 आज अश्विन शुक्ल अष्टमी दिनांक 22 ऑक्टोबर 2023. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची  महिषासुरमर्दिनी रुपात सजली‌ आहेत

 पूर्वी कोण एकेकाळी रंभ नावाचा दैत्य भगवान शंकरांची उपासना करत होता. त्याने उपासना करून भगवान शंकरांना त्यांच्यासारखा पराक्रमी पुत्र द्या असे वरदान मागितले. त्याला अनुसरून भगवान शंकरांनी आपलाच एक अंश पुत्ररूपात प्रगट होईल असे वरदान दिले रंभाने तिथे असलेल्या महिशीमध्ये आपले तेज टाकले तेव्हा त्यातून उग्र असा महिषासुर प्रगट झाला. त्याने सर्व देवांचे सर्व अधिकार काढून घेतल्यानंतर पराजित झालेल्या देवांनी ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश आहेत अशा ठिकाणी जाण्याचे ठरवले. त्या वेळेला देवांवर झालेले अन्याय ऐकून भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मा यांच्या शरीरातून तेज बाहेर पडले

 त्या तेजात सर्व देवांचे तेजही एकत्र झाले आणि तिथे सर्व दिशांची पोकळी व्यापारी अशी एक तेजाची शलाका प्रगट झाली शंकराच्या तेजापासून देवीचे मुख तयार झाले, यमाच्या तेजापासून केस, विष्णूंच्या तेजापासून बाहू ,चंद्र तेजापासून वक्षस्थळ, इंद्रदेव पासून तिचे मध्य शरीर वरूण तेजापासून तीच्या पोटऱ्या आणि मांड्या, पृथ्वी तेजापासून नितंब, ब्रह्म तेजापासून पाय, सूर्य तेजापासून पायाची बोटं, वसु तेजा पासून हाताची बोटं, कुबेराच्या तेजापासून नाक, दक्ष प्रजापतीच्या तेजापासून दात, दोन्ही संध्यांच्या तेजातून भुवया ,वायूच्या तेजापासून तिचे कान तयार झाले अशा या देवीला सर्व देवांनी आपापली शस्त्र दिली शंकराने त्रिशूल ,विष्णूने चक्र ,वरूणाने शंख, अग्नीने शक्ती, वायुने धनुष्यबाण भाता,इंद्राने वज्र ऐरावताची घंटा यमाचा दंड ,वरूणाने पाश प्रजापतीची अक्षमाला ,ब्रह्मदेवाने कमंडलू, सूर्याने रोमरोमातील तेज मृत्यूने ढाल आणि खडग क्षीरसागराने तिला शुभ्र हार आणि कधी न मळणारी वस्त्रं, किरीट कुंडल चंद्र आणि बाजूबंद दिले विश्वकर्माने तिला परशू दिला समुद्राने दोन फुलमाला दिल्या तसेच हातात धारण करण्यासाठी कमळ दिले. हिमालयाने सिंह व रत्नागिरी कुबेराने तिला पानपात्र दिले . शेषनागाने तिला नागहार दिला. अशा त्या पराक्रमी देवीला पाहून महिषासुर कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये धावत आला आणि त्याने तिच्याशी युद्ध सुरू केले देवी आणि तिच्या सिंहाने महिषासुराच्या सर्व सैन्याला मारताच महिषासुर धावत आला. त्याने देवीला त्रस्त करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तो रेड्याच्या शरीरात असताना देवीने त्याचे मस्तक उडवले व त्यातून अर्धा बाहेर आलेल्या महिषासुराला मारण्यासाठी दिले रेड्याच्या पाठीवर पाय ठेवला व शरीरातून बाहेर आलेल्या महिषासुराचे मस्तक उडवण्यासाठी त्रिशूलाने घाव घातला आज या स्वरूपात करवीर निवासिनी विराजमान आहे .

   करवीर निवासिनीची साधारणपणे दरवर्षी महाष्टमीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते याचे कारण म्हणजे तंत्र चुडामणी ग्रंथाप्रमाणे क्षेत्रातील शक्तीपीठ देवता अशी करवीर निवासिनीची श्री महाकाली ही चतुर्भुजा महिषासुरमर्दिनी रुपात आहे. आज अष्टमीचे हवन देखील तिच्यासमोर संपन्न होते अशा या करवीरच्या शक्तीपीठ देवतेचे स्मरण करण्यासाठी आज परंपरेला अनुसरून महिषासुरमर्दिनी रुपात देवीची पूजा बांधली जाते कारण आजच्या स्थितीला महिषासुराचा संहार देवीने केला होता अशी ही जगदंबा आपल्यातला मोह महिषासुर मारून आपल्याला उत्तम आयुष्य आरोग्य धनसंपदा प्रदान करो हीच त्या जगदंबे चरणी प्रार्थना..

श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.