आर्ट ऑफ लिव्हिंग दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ‘शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन : यंदाचे हे चौदावे वर्ष

आर्ट ऑफ लिव्हिंग दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ‘शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन : यंदाचे हे चौदावे वर्ष





 कोल्हापूर १८ प्रमोद पाटील 

गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंग दर वर्षी प्रमाणे या वर्षी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ चे आयोजन करण्यात येणार असून या मध्ये श्री. चंडी होम सह विविध होम आणि पूजा विधी करत आहेत. यंदाचे हे चौदावे वर्ष असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे पत्रकार परिषदेत आर्ट ऑफ लिव्हिंग च्या राजश्री दीदी यांनी माहिती दिली.

दि.२०,२१ आणि २२ ऑक्टोंबर या दिवसात सकाळी ७.३० वाजल्यापासून हे विधी होत आहेत. रविवार दि.२२ ऑक्टोंबर रोजी सकाळी श्री. महा चंडी होम होणार आहे. हे सर्व विधी आयर्विन मेमोरियल हॉल, गवत मंडई येथे होत आहेत. 

शुक्रवार दि. २० ऑक्टोंबर रोजी सकाळी श्री.महा गणेश होमाने सुरवात होईल. गणेश होमासोबत नवग्रह होम, वस्तू शांती होम होईल. सायंकाळी महा सुदर्शन होम होईल. या होमामध्ये साधक सुदर्शन क्रिया करून आपली साधना पक्व करतात. २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी महारुद्र होम होईल. सायंकाळी श्री. चंडी कलश स्थापना आणि पारायण होईल. चंडी होममध्ये १०८ कन्यांचे कुमारिका पूजन, बटू पूजन, दांपत्य पूजन, गो पूजा इत्यादी पूजा होतात. 
हे होम आर्ट ऑफ लिविंग चे ज्येष्ठ स्वामी अद्वैतानंदजी यांच्या पावन सानिध्यात होत असून स्वामीजी २३ वर्षापासून गुरुदेवांच्या सानिध्यात असून ते ज्येष्ठ प्रशिक्षक आहेत. हे होम आणि विधी करण्यासाठी बेंगळूरू स्थित वेद विज्ञान महाविद्यापीठमधील प्रशिक्षित ज्येष्ठ पंडित कौशिकजी सह अन्य तीन पंडित येत आहेत. 
या सर्व होमांची सांगता सत्संग आणि महाप्रसादाने होईल. दि.२० रोजी सायंकाळी युवकांसाठी ‘दांडिया आणि रास गरबा’ होत आहे, विविध कला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. श्री. चंडी होमाची सांगता महाप्रसादाने होईल. या सर्व होमांची फलिते वेगवेगळी आहेत. तसेच असे होम हवन आणि विधी यामधील हवन आणि मंत्रोच्चार यांच्यामुळे मानवी जीवनातील, मनातील ताण तणाव आणि नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते, सभोवतालच्या वातावरणाची शुद्धी होण्यास मदत होते आणि उपस्थितांना गहऱ्या ध्यानाची अनुभूती येते.
या होममध्ये सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, वारणा-कोडोली, पेठ वडगाव, मलकापूर आणि जिल्ह्यातील अन्य भागातील लोक सहभागी होत आहेत. 
हे सर्व होम सर्वांसाठी खुले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजश्री दिदी यांनी केले आहे. 

या होमाच्या आयोजनामध्ये राजेंद्र लकडे , सचिन पाटील, वैशाली शेडे, सचिन मुधाळे, अनिमा दहिभाते, अजय किल्लेदार, प्रवीण देशमुख, जगदीश कुडाळकर, विनायक मुरदंडे, राहुल नागवेकर, मंदिर चव्हाण, बिना जनवाडकर, हेमंत माळी, श्रद्धा लाड, अजिंक्य पाडगांवकर इत्यादी प्रशिक्षक आणि स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभणार आहे तरी या उस्तवावाचा समस्त करवीरकरानी लाभ घ्यावा असेही आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे सांगण्यात आले. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.