कोल्हापूरला मिळाली नवी नेतृत्वाची दिशा! डॉ. हेमांगी वलके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

 कोल्हापूरला मिळाली नवी नेतृत्वाची दिशा!

डॉ. हेमांगी वलके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड



कोल्हापूर, दि. २२- अविनाश शेलार

कोल्हापूरच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. हेमांगी वलके (MBBS, MD) यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची असलेली निष्ठा लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

डॉ. वलके यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. तसेच या निवडीबद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र विभाग आणि राष्ट्रीय सचिव डॉ. नरेंद्र उंदिरवाडे यांचे आभार मानले आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.