आजचे राशिभविष्य

 

🔯 आजचे राशिभविष्य –

 बुधवार, ११ मार्च २०२६



आज बुधवार ११ मार्च २०२६ फाल्गुन कृष्ण अष्टमी म्हणजेच काळाष्टमी. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी यांचे आजचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस, कोणत्या राशींना लाभ आणि कोणाला सावध राहावे लागेल ते वाचा

फाल्गुन कृष्ण अष्टमी | काळाष्टमी विशेष

📅 बुधवार, ११ मार्च २०२६
📿 फाल्गुन कृष्ण अष्टमी | वर्षा ऋतू
📆 विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२

🔮 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 संपर्क – 8087520521

राहुकाळ: दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

⚠️ आजचा विशेष दिवस: काळाष्टमी (वर्ज्य दिवस)

नक्षत्र: ज्येष्ठा (रात्री १०.०० नंतर मूळ)

👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी:

  • रात्री १०.०० पूर्वी – वृश्चिक

  • रात्री १०.०० नंतर – धनु

(वज्र योग आणि नक्षत्र गंडांत शांती करून घेणे हितावह)

📌 टीप: नावाप्रमाणेच राशी असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी "राशीभाव" फेसबुक पेजला भेट द्या.


♈ मेष

(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
संमिश्र ग्रहमान आहे. काही महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सरकारी कामातून अचानक लाभ मिळू शकतो. मात्र वाद टाळा. प्रवासात सावधगिरी बाळगा.

♉ वृषभ

(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
सप्तम स्थानी चंद्र असल्याने भागीदारीतून लाभ मिळेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

♊ मिथुन

(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामात विलंब होऊ शकतो. शत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या.

♋ कर्क

(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
प्रेमसंबंधात यश मिळेल. कलात्मक आणि धार्मिक कार्यात सहभाग होईल. समाजकार्य करताना थोडा त्रास संभवतो.

♌ सिंह

(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
घरगुती कामांमध्ये वेळ जाईल. मालमत्ता किंवा वाहन विषयक चर्चा पुढे सरकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

♍ कन्या

(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. सूर्यनमस्कार करणे लाभदायक ठरेल.

♎ तुळ

(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
अहंकार टाळणे गरजेचे आहे. व्यावसायिक कौशल्याची परीक्षा होईल. छोटे प्रवास होऊ शकतात.

♏ वृश्चिक

(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिवस सावधपणे घालवा. घरगुती कटकटींना सामोरे जावे लागू शकते.

♐ धनु

(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
व्यवसायात वाढ होईल. मात्र वाहन चालवताना किंवा सरकारी कामात दिरंगाई टाळा.

♑ मकर

(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
लाभ स्थानी चंद्र आहे. बोलताना संयम ठेवा. संपत्तीविषयक वाद निर्माण होऊ शकतात.

♒ कुंभ

(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
अहंकार टाळा. बाहेरील जबाबदाऱ्या स्वीकारताना विचार करा. बोलताना सावधगिरी बाळगा.

♓ मीन

(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
ग्रहमान अनुकूल आहे. अध्यात्मिक प्रगती होईल. काही गूढ गोष्टींची उकल होऊ शकते.


📢 कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करा.
"राशीभाव" कार्यक्रम बुकिंगसाठी फेसबुक पेजला भेट द्या.

🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
📞 8087520521


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.