मी खासबाग कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह बोलतोय

 मी खासबाग कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह बोलतोय 



८ ऑगस्ट २०२४ रोजीची ती काळरात्र....

विशेष लेख : ॲड. अनिल घाटगे 


मी खासबाग कुस्ती मैदान व केशवराव भोसले नाट्यगृह बोलतो आहे आज वर्ष झाले आम्ही दोघेही शाहूंचा ठेवा म्हणून मिरवत होतो पण आगीच्या भक्षस्थानी पडलो  ⁉️*    याविषयी वर्षभर कोल्हापूर मध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती *खरंच जर का हा आमचा कोणी घातपात केला❓* आम्हाला बोलता येत नाही म्हणून काय झालं परंतु या ठिकाणचा *प्रत्येक दगड बोलतो आहे तो म्हणतो आहे आम्हाला  राजषिऀ शाहू महाराजांचा स्पर्श झाला आहे*


*🚩राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ देण्यासाठी 1912 साली खासबा कुस्ती मैदानाची त्याचबरोबर 1915 साली बाहेरच्या देशाच्या धरतीवर कोल्हापुरात नाट्यगृहाची निर्मिती केली* त्याचे नाव नंतर केशवराव भोसले नाट्यगृह असे करण्यात आले

*कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा म्हणून कोल्हापूरच्या समाज मनावर कोरला गेलेला हा समृद्ध शाहू विचाराचा वारसा होता* तो गेल्या वर्षी तब्बल 110 वर्षानंतर कोलमडून पडला आणि *कणखर कोल्हापूर वासियांच्या अगदी पत्रकारांसह प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या*


 *राजर्षी शाहू महाराज यांनी* कोल्हापूर साठी इतकं काही करून ठेवला आहे की त्या उपकारातून *आम्ही कोल्हापूर कर कधीच मुक्त होणार नाहीत*

👉

1) राधानगरी धरण 

2) सर्व धर्मासाठी 34 वस्तीग्रह 

3) शेती तंत्रज्ञशाळा 

4) शाहू मिल 

5) रेल्वे स्टेशन, रेल्वे लाईन 

6) रंकाळा, कळंबा, राजाराम, तलाव 

7) छत्रपती सिने टोन 

8) जय प्रभात स्टुडिओ 

9) मार्केट यार्ड

10) चप्पल लाईन, गुजरी 

11) शाहूपुरी व्यापारी पेठ 

12) शैक्षणिक संस्था 

14) खासबाग कुस्ती मैदान 

15) केशवराव भोसले नाट्यगृह 

*इत्यादी*


*अशा एक ना अनेक संस्था महाराजांनी उभ्या केल्या जोपासल्या, वाढवल्या*  तो ठेवा एकेक करून लुप्त पावत आहे *या पाठीमागे फार मोठी शक्ती आहे* जी आम्हा कोल्हापूर वासियां च्या लक्षातच यायला तयार नाही *आम्ही एकमेकांचे पाय ओढण्यातच धन्यता मानतो आहोत*


*शाहू मिल बंद पाडली, छत्रपती सिने टोन जागे सह लुप्त झाला, जय प्रभात स्टुडिओ डोळ्या देखत गळंकृत केला, रंकाळ्याचा श्वास गुदमरतो आहे, कळंबा अस्तित्वासाठी धडपडतो आहे, राजाराम तलावाचा गळा कधी आवळला जाईल सांगता येत नाही, मराठा बोर्डिंग बंद आहे*


*क्रांती दिनाच्या पूर्व संध्यॆला म्हणजेच 8 ऑगस्ट 20 24 रोजी रात्री 9:15 वाजता खासबाग कुस्ती मैदान व केशवराव भोसले नाट्यगृह अग्नितांडवात भस्मसात झाले* आणि करवीरकरांचे मन गहीवरून गेले  *राजर्षी शाहू महाराज यांचा ठेवा कोण उध्वस्त करत आहे त्याच्या पेकटात लाथ घातली पाहिजे* अर्थात शब्दशः न्हवे 


*महाराष्ट्राची आख्खी तिजोरी जरी आपण रिकामी केली तरी *ना खासबाग मैदान❗, ना केशवराव भोसले नाट्यगृह ❗आम्हाला परत मिळणार* मुख्यमंत्री साहेब त्या प्रत्येक खांबात, प्रत्येक पायरीला, प्रत्येक वस्तूला *महाराजांचा स्पर्श झाला होता तो तुम्ही आम्हाला कसा काय परत देणार❓* 


 *👉 अगदी तत्परतेने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पालकमंत्री हसन मुश्रीफ* यांनी दहा कोटी रुपयांचा निधी जाहीर करून *विधानसभेच्या आचारसंहिते पूर्वी कामाला सुरुवात केली* आज नाट्यगृहाचे *तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू होत आहे ही बाब चांगलीच आहे.*


 *खा. छत्रपती शाहू महाराज या सर्व बांधकामावर जातीनिशी लक्ष ठेवून आहेत* त्यांनी निर्माण केलेल्या विविध कमिटी देखील यामध्ये लक्ष घालत आहे हे जरी खरं असलं तरी *कोल्हापूरकरांना झालेल्या वेदनेचं काय⁉️* यदा कदाचित आपण आहे तशी वास्तू उभी हीकराल *परंतु कोल्हापूरकरांना या अग्नी तांडवाच्या मागचे "सत्य" आजही कळाले नाही त्याचे काय⁉️👏*


अस्वस्थ कोल्हापूरकर


*अनिल घाटगे* 

B com DLL M Com LLB 

राजकीय विश्लेषक व अभ्यासक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.