निर्भया पथक अधिक कार्यक्षम करा आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करा : महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे

निर्भया पथक अधिक कार्यक्षम करा आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करा :  महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे



कोल्हापूर ०८ (अविनाश काटे) : 

निर्भया पथक अधिक कार्यक्षम कराआणि सायबर क्राईम रोखण्यासाठीविशेष प्रयत्न करा अशा सूचना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेआणि गृह ग्रामीणराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केल्यात.आज कोल्हापूर पोलीस मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि गृह विभागाचे ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. 

आज दुपारी त्यांनी पोलीस मुख्यालयात गेल्या वर्षभरातील पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा घेतला. सुरुवातीला पोलीस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार बच्चू आणि आप्पासाहेब जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री नाम. अदिती तटकरे आणि नामदार पंकज भोयर

स्वागत केलं.यानंतर पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की आणि सहायक पोलिस निरीक्षक स्वाती

यादव यांनी गेल्या वर्षभरातील पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा मंत्रि महोदयासमोर मांडला.यानंतर

बोलताना नामदार पंकज भोयर यांनी

महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अधिक सक्षम करा अशा सूचना दिल्या.तसेच राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवत आहे. त्याच पद्धतीने सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी देखील कटीबद्ध आहे अशी ग्वाही दिली.तर नामदार अदिती तटकरे यांनी महिला आणि मुलींच्या वरील अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिला मुलींच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आदिशक्ती समिती आणि बालिका पंचायत समिती स्थापन करण्यात आलीय यासंदर्भात महिला मुलींच्या पर्यंत पोहोचून जनजागृती करा. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला मुलींची होत असलेली छेडछाड रोखण्यासाठी शाळा महाविद्यालयात प्रबोधन करा अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. 

यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने नामदार आदिती तटकरे आणि नामदार पंकज भोयर यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा देखील साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे

प्रवीण खानापुरे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.