लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा कोल्हापूर तर्फे पत्रकारांचा सन्मान

 लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा कोल्हापूर तर्फे पत्रकारांचा सन्मान 



कोल्हापूर ७ प्रमोद पाटील 

महाराष्ट्र राज्यामध्ये गेली 23 वर्ष लोक मंगल उद्योग समूह व लोकमंगल सहकारी पतसंस्था ची दैदीप्यमान कारकीर्द सुरू आहे 

या लोकमंगल विविध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा  सुभाष देशमुख उर्फ बापू यांनी निर्मिती केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 64 शाखा विस्तार कार्यरत आहे अंदाजे दहा हजार कर्मचारी संख्या बळ असलेला सर्वात मोठा सहकार समुह म्हणून लोकमंगलचा नावलौकिक आहे कोल्हापूर मध्ये लोकमंगल सहकारी पतसंस्था तसेच लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा विस्तार आहे आज राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून कोल्हापुरातील श्रमजीवी पत्रकारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला एस पी एन चॅनेल चे विश्वास पानारी दैनिक प्रीतीसंगमच्या अर्पणा पाटील,  वेदवाणी न्यूज चॅनलच्या रूपाली चव्हाण ,दर्पण चॅनेलचे अनिल पाटील ,चॅनेल पवित्र  आणि हिंदू दैनिक स्वाभिमानी छा वा चे अविनाश शेलार मराठा क्रांती चॅनेल आणि  दैनिक मराठा क्रांती  चे शरद ठाणेकर ज्येष्ठ  पत्रकार माहिती अधिकार न्यूज चॅनेल अरुण शिंदे यांचा पुष्पगुच्छ व यथोचित सन्मान लोकमंगल पतसंस्थेचे तज्ञ संचालक प्रा.डॉ. विठ्ठलराव ढेकळे यांच्या हस्ते केला. हा कार्यक्रम लोकमंगल नागरी पतसंस्था सीबीएस स्टॅन्ड जेम्स स्टोन बिल्डिंग कोल्हापूर येथे झाला 

यावेळी बँकेचे मॅनेजर कुंदन ताकमोगे ,शाखा अधिकारी 

विक्रम घोसाळकर, सीनियर क्लार्क स्टाफ दिपाली पाटील 

स्नेहल माळगी, निकिता गवळी, रेवती निळकंठ 

आकाश जाधव आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.