झूम प्रकल्प येथील आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

 झूम प्रकल्प येथील आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू



कोल्हापूर २६ प्रमोद पाटील 

 झूम प्रकल्पावर गेले दोन दिवस छोट्या प्रमाणात आग लागून ती धुमसत होती. सदरची आग महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटर व टँकरद्वारे वेळोवेळी विझविण्यात येत होती. आजअष्टेकर नगरच्या बाजूला वारे जास्त असल्याने आगीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे सकाळपासून अग्निशमन विभागाच्या दोन फायर फायटर व दोन पाण्याच्या टँकर द्वारे आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. प्रशासक के मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनाखाली 2 फायर फायटर व 2 टँकरच्या 20 फेऱ्याद्वारे सदरची आग आज 80 टक्के आटोक्यात आणण्यात आली आहे या आगीच्या नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाचे 12 जवान व आरोग्य विभागाचे 8 कर्मचारी सकाळपासून राबत आहेत. आता आगीचे प्रमाण कमी झाले असून अद्याप आग विझवण्याचे काम सुरू आहे. प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी उद्यापासून खाजगी टँकरही या ठिकाणी उपस्थित ठेवण्याच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या आहेत.

आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी झूमच्या प्रकल्पावर भेट देऊन आगीच्या नियंत्रणाचे कामकाजावर लक्ष ठेवले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.