कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरूवात

 

कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरूवात


कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडी मध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवक संजय निकम, चंद्रकांत घाडगे, वैभव माने, उमेश माने, धीरज पाटील, किशोर पवार, प्रवीण वाघमारे, सोनल वाघमारे, पंकज किडगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटीबध्द असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. त्यानंतर प्रभाग क्रमांक ४५ अंतर्गत कैलासगडची स्वारी परिसरात मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम नगरोत्थान महाअभियानांतर्गत २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. 


जाहिरात करा कोल्हापूर online वर 1499/- मध्ये  मिळवा १००० multicolour visiting card  मोफत संपर्क 7499565484


या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला संतोष महाडिक, अभिजीत पाटील, प्रसाद जाधव, संपत जाधव, उदय पाटील, निवास शिंदे, बाळासाहेब पाटील, मिलिंद गुरव कुणाल शिंदे, युवराज कुरणे, आर्यनील जाधव, आणि श्रीधर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणं प्रभाग क्रमांक ७, सर्किट हाऊस परिसरातील अग्निहोत्री घर ते ईगल पाईप रस्ता, कापसे कॉलनी मार्गाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी संजय निकम, सुनील नाणिवडेकर, महावीर मंगदुम, अ‍ॅड. डी. बी. कापसे, एन.जी. पाटील आणि अजिंक्य तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रभाग क्रमांक ६२ बुध्द गार्डन परिसरातील आयडीयल सोसायटीमध्ये अशोक साळोखे यांच्या घरापासून ते रेसिडेन्सि मित्र मंडळापर्यंतच्या मार्गावर गटार बांधकामासाठी २० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. त्याचीही सुरूवात कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली. या शुभारंभ वेळी रणजित कांबळे, रविकिरण गवळी, प्रेम रजपुत, मोहन जाधव, मंगलताई निपाणीकर, राजू खडके, जय खडके, सुनिल देशपांडे, सनी आवळे, महेश खडके, महेश जाधव, अभि सावंत, प्रभूराज भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.