लक्ष्मीपुरी बाजारपेठेमधील गटारीचे सांडपाणी रस्त्यावर, कोल्हापूर शहराच्या गलिच्छतामध्ये भर

 लक्ष्मीपुरी बाजारपेठेमधील गटारीचे सांडपाणी रस्त्यावर, कोल्हापूर शहराच्या गलिच्छतामध्ये भर



महापालिकेच्या संबंधित विभागाने समस्येचे तातडीने निराकरण करावे - समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी



कोल्हापूर, ता.९ प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी बाजारपेठ वसलेली आहे. मात्र या बाजारपेठेचां प्रवेशद्वार सध्या घाणीच्या साम्राज्यात आहे. अर्थात परमाळे सायकल कंपनी समोर गटारीचे घाण पाणी रस्त्यावर येऊन पसरलेले आहे. शहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेमध्ये असे  अंघोळवाने दर्शन  कोल्हापूरसाठी नक्कीच भूषणावह नाही.

 गेल्या अनेक दिवसांपासून अशीच अवस्था आहे. याशिवाय दर रविवारी येथे भरणारा आठवडी बाजार आणि संबंधित व्यापाऱ्यांचा कचरा यामुळे येथील परिसर अक्षरशः कचऱ्यात न्हाऊन निघाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देऊन येथील परिसराची स्वच्छता करावी, तसेच येथे काही फेरीवाले आणि व्यापारी आपला उरलेला कुचका नासका माल टाकून जातात, अशा व्यापाऱ्यांवर ही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी समाज मन बहुउद्देशीय सामाजिक संस्था या निवेदनाद्वारे करत आहे. 

कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत लक्ष्मीपुरी बाजारपेठ वसलेली आहे. या बाजारपेठेमुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मीपुरी परमाळे सायकल कंपनी समोर असणारी एक गटार तुंबून तिचे सांडपाणी रस्त्यावर पसरलेले आहे. या गटारीचे तोंडले घाण पाणी रस्त्यावर आल्यामुळे येथील काही फेरीवाले आपल्या मालगाड्या रस्त्याच्या मध्यभागा जवळ येऊन लावतात, त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना अडथळा निर्माण होतो. त्याशिवाय या ठिकाणी दर रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र काही बेजबाबदार व्यापारी आणि फेरीवाले आपला उरलेला कुचका नासका माल या ठिकाणी टाकून जातात. त्यामुळे या परिसराच्या गलिच्छतेमध्ये आणखीनच भर पडते आणि ही बाब अन आरोग्यालाही कारणीभूत ठरू शकते.

कोल्हापूर शहरात पर्यटक सध्या मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्याही नजरेत ही दुर्दशा दररोज भरते आणि ही बाब स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लावणारी ठरली आहे. आणि हे कोल्हापूरच्या लोक एकाला नक्कीच शोभणारी नाहीये. लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केलेला दिसत आहे ही गोष्ट अनाकलनीय आहे 

 येथील समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील समस्येचे तातडीने निराकरण करण्यात यावे, तसेच येथे कचरा सडका माल, घाण टाकून जाणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था करत आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.