"शाळेत बुद्धिबळ" ( "चेस इन स्कूल") या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात बुद्धिबळ प्रशिक्षक शिबीराचे आयोजन, कोल्हापुरात रविवारी 15 डिसेंबरला
कोल्हापूर १० प्रमोद पाटील
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने *"शाळेत बुद्धिबळ" (Chess In School)* या उपक्रमाअंतर्गत बुद्धिबळ प्रशिक्षक होण्याकरता “प्रशिक्षकांना प्रशिक्षण"(Train The Trainers) या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापुर, नांदेड, जळगाव, ठाणे व रायगड आदी जिल्ह्यात केले आहे.
सदर शिबिर एक दिवसाचे असून शाळेसाठी बुद्धिबळ प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुद्धिबळातील तांत्रिक कौशल्ये,चेस इन स्कूलचा अभ्यासक्रम, इंटरनेट व वेबसाईट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बुद्धिबळासाठी करण्यासंबंधीत सर्व प्रकारची माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १८ वर्षापुढील बुद्धिबळाचे आवड असणारे विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडा शिक्षक या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊ शकतात.
भारतीय बुद्धिबळ संघाचे मुख्य प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सन्मानित ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने यशस्वीरित्या राबविण्यात आलेला "चेस इन स्कूल" हा उपक्रम पुन्हा नव्या जोमाने येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्याचा संकल्प महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक मान्यताप्राप्त प्रशिक्षक तयार करण्यासाठी शाळेसाठी बुद्धिबळ प्रशिक्षक शिबीर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. शिबिर झाल्यावर प्रशिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. अशा होणाऱ्या प्रत्येक शिबिरासाठी मर्यादित प्रथम येणाऱ्या 30 बुद्धिबळपटूनाच प्रवेश दिला जाईल. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने *सीआयएस – मान्यताप्राप्त स्कूल प्रशिक्षक( CIS - Trainer)* ची पदवी व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून असे मान्यताप्राप्त बुद्धिबळ प्रशिक्षक विविध शाळेमध्ये शाळेत बुद्धिबळ (चेस इन स्कुल) या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देऊ शकतील.तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी प्रवेश शुल्क रु.दोन हजार ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या खात्यात जमा करून गुगल फॉर्म द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
यापैकी कोल्हापुरात होणारे शिबिर रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी आयोजित केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा
1) भरत चौगुले - 7620067251, 2) मनीष मारुलकर 9922965173 , 3) उत्कर्ष लोमटे - 9923058149*
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात होणाऱ्या या शिबिराचा महाराष्ट्रातील बुद्धिबळाची आवड असणारे जास्तीत जास्त प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे आधारस्तंभ अशोक भाऊ जैन, अध्यक्ष परिणयजी फुके, सचिव निरंजन गोडबोले, चेस इन स्कूल कमिटीचे चेअरमन गिरीश चितळे, उपाध्यक्ष अतुल जैन, सिद्धार्थ मयूर खजिनदार व चेस इन स्कूल कार्यकारी कमिटीचे सचिव विलास म्हात्रे, सह सचिव समुख गायकवाड, सलील घाटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, महाराष्ट्र चेस इन स्कूल कमिटीचे हेमेंद्र पटेल, भूषण श्रीवास, रवींद्र धर्माधिकारी, मंगेश गंभिरे, प्रवीण ठाकरे, आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.



