महिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाड

 महिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाड


 नंदगाव : येथे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना विजय गायकवाड, सोबत आमदार ऋतुराज पाटील आदि मान्यवर


कोल्हापूर १४ प्रमोद पाटील 

: महिलांना धमकी देता, दादागिरीची भाषा बोलता, व्यवस्था करतो म्हणता. या महिला काय तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? असा सवाल विजय गायकवाड यांनी महाडिकांना केला. नंदगाव येथे आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

आ. ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगेंनी सहकार क्षेत्रात जे काम केले आहे, ते संपूर्ण देशात आदर्श घेण्यासारखे आहे. त्यांनी राजकारण करताना सुद्धा एका वेगळ्या विचारसरणीने केले. राजकारणात कधी शत्रुत्व मानलं नाही तर लोकशाही मधली एक प्रक्रिया असे मानलं. हाच विचार माझ्यासारख्या तरुण आमदाराला भावतो आणि त्यांच्या विचारांवरच माझी वाटचाल सुरु आहे.  

नंदगावच्या माजी उपसरपंच मयुरी नरके म्हणाल्या, खासदार धनंजय महाडिकांनी केलेला अपमान कोल्हापूरच्या रणरागिनी कधीही विसरणार नाहीत. महिलांची व्यवस्था करतो म्हणणा-या महाडिकांचा महिलाच बंदोबस्त करतील.  

सनी नरके म्हणाले, विरोधक विकासकामांवर बोलण्यापेक्षा जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही विकासाचे व्हिजन असलेल्या ऋतुराज पाटील यांना आमदार करू.

डी. आर. पाटील, डॉ. महिपती पाटील, विलास साठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निगवे खालसा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. सभेला मारुती निगवे, प्रकाश सावंत, शाबाजी कुराडे, सर्जेराव कांबळे, पांडुरंग नरके, मोहन कुंभार, अंकुश झांबरे, सुषमा चौगले, सुजाता पाटील, पांडुरंग वाघमारे, संजय नरके, संजय पाटील, विश्वास दिंडोर्ले, विजय नलावडे, बाळासाहेब चौगले संग्राम नरके मोहन पाटील यांच्यासह नंदगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दुस-यांच्या संस्थेत घुसून महाडिकांनी स्वत:चा फायदा केला : सुयोग वाडकर

जिल्ह्यात स्वर्गीय  विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू दूध संघ, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दूध संघ, दादासाहेब कौलवकर यांनी भोगावती कारखाना अशा अनेक चांगल्या संस्था सुरू केल्या.  मात्र, महाडिकांनी व्यंकटेश्वरा वाहतूक संघाच्या माध्यमातून 40 ते 50 टँकर गोकुळ दूध संघामध्ये स्वत:च्या फायद्यासाठीच लावले. संस्था उभारण्यापेक्षा दुस-यांनी उभारलेल्या संस्थेत घुसून महाडिकांनी स्वत:चा फायदा करुन घेतला अशी टीका बाजार समिती संचालक सुयोग वाडकर यांनी केली.


.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.