बालाजी कलेक्शन चे प्रशांत पोकळे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्री कल्चर च्या टेक्सटाइल अँड ॲपरल विभागाच्या तज्ञ समितीच्या को – चेअरमन पदी निवड


बालाजी कलेक्शन चे प्रशांत पोकळे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्री कल्चर च्या टेक्सटाइल अँड ॲपरल विभागाच्या तज्ञ समितीच्या को – चेअरमन पदी निवड

बालाजी कलेक्शन चे प्रशांत पोकळे


 कोल्हापूर १ प्रमोद पाटील 

कोल्हापूर जिल्ह्यातील गारमेंट क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि बालाजी कलेक्शन चे प्रशांत पोकळे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्री कल्चर च्या टेक्सटाइल अँड ॲपरल विभागाच्या तज्ञ समितीच्या को – चेअरमन पदी निवड झाली आहे.ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रेत्यांपुढे दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असताना पोकळे यांच्या निवडीमुळे रिटेल आणि होलसेल गारमेंट व्यावसायिकांच्या समाधानाची लाट पसरली आहे.सुमारे 25 वर्षाचा अनुभव असणारा तरुण उद्योजकाची निवड ही सार्थ ठरविणारी आहे असे काही व्यावसायिकांनी सांगितले.

प्रशांत पोकळे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात असणारा व्यावसायिकांचा उत्कृष्ठ जनसंपर्क आणि या व्यवसायातील असणाऱ्या अडचणी यांचा सखोल अभ्यास असल्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रातील व्यवसायिकांना पाठबळ मिळून स्पर्धेमध्ये टिकून राहण्यास मदत होणार आहे.तसेच सरकारी धोरणांबाबत समन्वय  ठेवून व्यवसायिकांना  योग्य न्याय देणेकामी एका धडाडीच्या उमद्या उद्योजकाची यानिमित्ताने नेमणूक झाली आहे असे म्हणता भारतामध्ये जीएसटी मध्ये 5% आणि 12% चा जो तफावत आहे. रेडीमेड गारमेंट व फॅब्रिक व साडी याच्या मध्ये जो तफावत आहे. त्यामुळे रेडिमेड वाल्यांनी ह्या व्यापाऱ्यांना त्याचा खूप झळ बसत आहे. .सोलापूर,कोल्हापूर,कोकण यासह विदर्भ मराठवाडा याठिकाणी टेक्स्टाईल पार्क साठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे पोकळे यांनी बोलून दाखविले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही नियुक्ती केली आहे.प्रशांत पोकळे हे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक असून ते राजारामपुरी व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष म्हणूनसुद्धा काम करत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.