स्वप्निल कुसाळने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जिंकले कांस्यपदक

स्वप्निल कुसाळने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जिंकले कांस्यपदक 



 कोल्हापूर १ प्रमोद पाटील 

पॅरिस येथे ऑलिपिक स्पर्धा सुरू आहे. जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंचा कसं या स्पर्धेत लागत आहे. आज दिवस गाजविला तो आपल्या जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील  नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे याने . 

आज कोल्हापूरचा  नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदक जिंकले. त्याने कास्यपदक जिंकताच केवळ कोल्हापूर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात आनंदोत्सव सुरू झाला आहे. आणि त्याच्यावर संपूर्ण भारतातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

 तब्बल ७२ वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिपिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.                               

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील हा खेळाडू. वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक. तर आई  अनिता या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.