मेस्सी स्टाईल ने चषक उंचावून रोहित ने जिंकली चाहत्यांची मने

 मेस्सी स्टाईल ने चषक उंचावून रोहित ने जिंकली चाहत्यांची मने 



कोल्हापूर 30 प्रमोद पाटील 

तब्बल १७ वर्षाचा वनवास संपवून रोहित शर्मा च्या नेतृत्वात भारताने ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. चोकर्स समजल्या जाणाऱ्या आफ्रिकन संघाने अंतिम सामन्यात लढाई चांगलीच दिली.  पण अनुभव आणि मोठ्या स्पर्धेत बाजी कशी मारायची याचा अंदाज आफ्रिकन संघाचा चुकला आणि हातात आलेला सामना गमावला. 



संपूर्ण स्पर्धेत रोहित शर्मा आणि टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. एक वेगळ्या टीम चा अनुभव तमाम क्रिकेट चाहते घेत होते. डेव्हिड मिलर चा तो अप्रतिम झेल सूर्यकुमार घेतला आम्हाला जोंटी रोहड्स ची आठवण आली. 

एकूणच जो अप्रतिम खेळ करतो तोच संघ बाजी मारतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही परत एकत्र ह्या फॉरमॅट मध्ये दिसणार नाही. त्यांनी तसे जाहीर करताच चाहत्यांची मने नाराज झालीत पण त्यांनी दिलेल्या या सांघिक यशचे ते नेहमीच पातक असतील . 

फार वर्षापूर्वी फुटबॉल पटू मेस्सी ने आपल्याच वेगळ्या स्टाईल ने चषक घेतला होता त्याचीच अनुभूती काल रोहित ने दिली .


आमच्या टीम तर्फे टीम इंडियाचे अभिनंदन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.