महालक्ष्मी हॉस्पिटल पुरस्कृत सतरा वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी पद्माराजे हायस्कूल मध्ये होणार

 महालक्ष्मी हॉस्पिटल पुरस्कृत सतरा वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी पद्माराजे हायस्कूल मध्ये होणार



 कोल्हापूर २९ प्रमोद पाटील 

 चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने व न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कै.लतादेवी अनिल लोहीया स्पोर्ट्स अकॅडमी च्या सहकार्याने रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी सतरा वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा महालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश पाटील व दीपा पाटील यांनी पुरस्कृत केले आहे.

कै‌. लतादेवी अनिल लोहीया चेस अकॅडमी, पद्माराजे गर्लस् हायस्कूल मध्ये या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी साडेदहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर अकरा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील 1/1/2007 ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना भाग घेता येईल.

या निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड 6 ते 8 जुलै 2024 दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.

  मुले आणि मुली दोन्ही गटातील विजेत्यांना व उपविजेत्यांना अनुक्रमे रोख पंधराशे व एक हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 याव्यतिरिक्त 15, 13, 11, 9 व 7 वर्षाखालील मुला-मुलींना प्रत्येक गटात दोन मेडल्स अशी एकूण 20 मेडल्स् उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेचा टी-शर्ट व राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रुपये दोनशे प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शनिवार दिनांक 29 जूनला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.


  1) श्री. भरत चौगुले -  7620067251.

 2) मनीष मारुलकर - 9922965173

3) उत्कर्ष लोमटे - 9923058149

4) प्रितम घोडके  - 8208650388

5) रोहित पोळ - 9657333926

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.