गणपत पाटील यांच्या घुंगरू कादंबरी स विशेष साहित्यिक पुरस्कार जाहीर - सर्व थरातून अभिनंदन

 गणपत पाटील यांच्या घुंगरू कादंबरी स विशेष  साहित्यिक पुरस्कार जाहीर - सर्व थरातून अभिनंदन    





        कोल्हापूर ७ प्रमोद पाटील 

 मुळचे आजरा चे असलेल्या आणि  प्रदीर्घ काळ मुंबई पोलिस मध्ये सेवा बजावत पोलिस उपनिरिक्षक पदावरून  निवृत झालेले गणपत हरि पाटील यांच्या 'घुंगरू 'या विशेष कांदबरीस साहित्य पुरस्कार घोषित झाला  आहे . महागांव ( ता .गडहिंग्लज ) येथील ज्येष्ठ  साहित्यिक प्रा .रसूल सोलापुरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे वाचन कट्टा संस्थेच्या वतीने प्रकाशित झालेल्या या घुंगरू कादंबरी हा चौथा पुरस्कार लाभल्याने लेखक गणपत पाटील यांचे विविध सामाजिक  थरातून अभिनंदन होत आहे . त्याची यापूर्वी तीन पुस्तके प्रकाशित झाले असून विविध वृत्तपत्रात तसेच दिवाळी अंकाची त्यांचे लेखन साहित्य प्रसिद्ध झाले आहेत . पोलीस दलातील सेवा बजावत त्यांनी हा आपला साहित्यिक छंद  एक आवड म्हणून जोपासला आहे . त्यांच्या सर्वच साहित्यिक कलाकृतीमध्ये असलेला सीमा भागातील कन्नड मराठी मिश्रित भाषेचा एक वेगळाच बाज हा बोली  भाषा अभ्यासकासाठी एक अभ्यासाचा विषय ठरला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.