आपल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज यांच्या वतीने एक दिवसीय संप आणि निदर्शने

आपल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र सेल्स आणिमेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज यांच्या वतीने एक दिवसीय संप आणि निदर्शने 



 कोल्हापूर २० प्रमोद पाटील 

फेडरेशन ऑफ मेडिकल अॅन्ड रिप्रेझेन्टेटिव्हज असोसिएशन्स ऑफ इंडिया (FMRAI) च्या आहवनानुसार देशभरातील २,००,००० चे वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज) यांनी  आज (दि. २०) कोल्हापुरात  आठ सुत्री मागण्यासाठी  संप आणि निदर्शने केली. 



ज्या "विक्री संवर्धन कर्मचारी कायदा १९७६ (SPE ACT 1976)" मुळे वैद्यकीय प्रतिनिर्थीच्या नोकरीला कायदेशिर संरक्षण गिळून त्यांच्या नोकरीत स्थैर्यता आली व त्यांचे भौतिक जीवन उन्नत झाले. तो "SPE ACT 1976" कायदा केंद्रातील पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने सप्टेंबर २०२० च्या संसदेच्या अधिवेशनात नविन श्रम संहिता पारित करतांना मोडित काढला आहे, त्यामुळे मालक वर्गाला कामगार कर्मचा- पांचे शोषण करायसाठीधा मुक्त परवाना मिळाला असून त्यांच्या गुलामगिरीत वाढ होणार आहे तसेच वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे नियमन कायद्या अंतर्गत ठरवलेले नसल्यामुळे त्यांचे प्रचंड शोषण कंपन्या स्वतःचे खाजगी कामाचे नियम बनवून करीत आहे. तसेच सरकारी आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधी प्रमोशन साठी केंद्र सरकारने बंदी घालून घटनेने दिलेल्या रोजगाराच्या अधिकारावर गदा आणली आहे.


त्याच बरोबर केंद्र सरकार कडे औषधांच्या विगतीचे नियमन करायची यंत्रणा असून सुध्दा सरकार औषध कंपन्यांच्या दबावाखाली त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत नाही. बरी औषध व औषधी उपकरणे जसे मेडिकल इम्प्लांट (हृदयरोग साठी) व इतर उपकरणे यावरील GST (जि.एस.टी) रद्द करून सर्वसामान्य जनतेला सध्याच्या महगाईत दिलासा दयावा.

अश्या विविध मागण्यासाठी आज एक दिवसीय संप आणि निदर्शने  करण्यात आले . यावेळी विजय धनवडे , विवेकानंद गोडसे, संज्योत जयस्वाल, प्रसाद देसाई , नामदेव उरूनकर , गणेश कामेंकरी, पंकज नेर्ल आदी महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज असोसिएशन कोल्हापूर विभागाचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.