आधुनिक तंत्रज्ञान आणि जीवनशैली यांची नवी ओळख "स्मार्ट आर्ट वर्ल्ड" : उज्वल नागेशकर

आधुनिक तंत्रज्ञान आणि जीवनशैली यांची नवी ओळख "स्मार्ट आर्ट वर्ल्ड" : उज्वल नागेशकर   



                

कोल्हापूर १० प्रमोद पाटील 

 डिजिटल युगात ,आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिपुर्ण सेवा सुविधा या मानवी जीवन अधिक आनंदी - सुखकारक व्हावे यासाठी घरापासून ते आपल्या कार्यालयापर्यंतच्या सर्व ठिकाणी 'स्मार्ट आर्ट वर्ल्ड' ही भक्कम सुरुवात आहेच, या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या विविध सेवा सुविधा या नक्कीच लाख मोलाच्या ठरतील ' अशा शब्दात आपल्या शुभेच्छा हॉटेल मालक संघ असोसिएशनचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी व्यक्त केले .



 त्यांच्या हस्ते वृषाली हॉटेल नजीकच्या या आधुनिक शोरूम आणि सेवा केंद्राचा शुभारंभ झाला . प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना स्मार्ट आर्ट वर्ल्ड चे सी ई ओ प्रशांत उर्फ उदय पाटील यांनी या मागील सर्व संकल्पना विषद करत "आधुनिकतेची कास धरत घरापासून ते कार्यालयापर्यंत दैनंदिन जीवनामध्ये अधिकाधिक सुरक्षा आणि अधिकाधिक वेळ आणि पैसे वाचवणारी उपकरणे आणि त्या मधून मिळणारा निखळ आनंद आणि वाढणारी कार्यक्षमता यासाठी सर्व सुविधा एकत्र देण्यासाठी स्मार्ट आर्ट वर्ल्ड कार्यरत राहणार आहे" असे नमूद केले . ' "घर आणि कार्यालयातील सर्व विद्युत उपकरणे जगात कुठेही प्रवासात असतानाही स्वयंतलिपणे बंद - सुरु करण्याची सुविधा पासून ते आपल्या बंगल्याचे गेट उघडणे आणि बंद करण्यापासून ते कार्यालयातील सर्व यंत्रणा या मोबाईल दारे नियंत्रित करून आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धी ही सर्वानाच उपयोगी पडेल!" अश्या शब्दात क्रिडाई अध्यक्ष के पी खोत यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या .



 ' स्मार्ट आर्ट वर्ल्ड 'ची ही कोल्हापुरातील पहिली शाखा आहे . तिचा विस्तार होऊन ती कोल्हापूरची वेगळी ओळख ठरेल असा विश्वास यावेळी डॉक्टर संदीप पाटील व्यक्त केला .यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी "कोल्हापूर आता मुंबई पुण्यानंतर महानगर म्हणून उभे राहत असताना अशा प्रकारच्या एकाच ठिकाणी मिळणाऱ्या सेवा सुविधा या नक्कीच कोल्हापूरच्या उद्योग विश्वा ला पुढे नेणार आहेत" असे मनोगत व्यक्त केले . यावेळी रोटरी प्रांतपाल नासिर बोरसादवाला, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोशिशनचे मानद सचिव मदन पाटील, कोल्हापूर बार असोसिएशनचे प्रशांत देसाई , जीपीएचे अध्यक्ष राजेश सातपुते , उद्योजक शंकर पाटील , मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत नाना मुळीक , ॲड महेश खांडेकर , जयेश ओसवाल , बी एन आय चे इरफान बोरगावे नितीन सोनटक्के, संदेश गावंदे, दिनेश माळी, युवा पत्रकार संघाचे शिवाजी शिंगे, जे.बी.पाटील, गुंडा पाटील, कुमार पाटील यांच्यासह विविध वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा व बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . सर्व पाहुण्यांचे स्वागत प्रियांका आणि प्रत्यय पाटील परिवाराने केले . या शुभारंभा निमित्त पहाटे ऋचा गावंदे यांच्या 'णमोकार महामंत्र आणि भक्ती गीत गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला ..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.