आजपासून आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू

आजपासून आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू






 कोल्हापूर २० प्रमोद पाटील 

 आर्ट ऑफ लिविंग तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत याही वर्षी आज पासून आज पासून विविध धार्मिक कार्यक्रमांची  सुरू झाले. तीन दिवस हे कार्यक्रम चालणार असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे यंदाचे हे चौदावे वर्ष आहे. 


गुरुदेव श्री. श्री. रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंग चे शारदीय नवरात्र निमित्ताने विविध होम आणि पूजा आज  सकाळ पासून  आयर्विन मेमोरिअल हॉल येथे सुरू झाले. 



स्वामी आत्मानंदजी यांच्या पावन उपस्थितीत आणि पंडित जी कौशिक आणि इतर यांच्या पावन हस्ते श्री. गणेश, नवग्रह आणि वास्तु होम सकाळी झाले.

तर सायंकाळी श्री. सुदर्शन होम संपन्न झाला. सुदर्शन होम मध्ये उपस्थित साधकांनी सुदर्शन क्रिया केली. उपस्थितांना गहऱ्या ध्यानाचा अनुभव आला. 


शनिवार दि. 21 रोजी सकाळी महा रुद्र होम आणि सायंकाळी चंडी होम साठी कलश स्थापना आणि पारायण होईल. 


रविवार दि. 22 रोजी सकाळी 7.30 वाजता महा चंडी होम होईल. यामध्ये 108 कन्या पूजन, दांपत्य पूजा,  अश्व आणि गो पूजन होते. 

महाप्रसादा नन्तर सांगता होईल. 

या सर्व होम यांना उपस्थित राहून सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन राजश्री दीदी भोसले पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.