षोडशकारण सोहळ्यास विनय संपन्नता विषय हितगुजपर मुनी श्री चे विवेचन : आर के नगर मैदानात प्रतिमा विद्या प्रतिष्ठान वतीने भव्य आयोजन

 षोडशकारण सोहळ्यास विनय संपन्नता विषय हितगुजपर मुनी श्री चे विवेचन :  आर के नगर मैदानात प्रतिमा विद्या प्रतिष्ठान वतीने  भव्य आयोजन





 कोल्हापूर - १७ प्रतिनिधी

मंगलमय वातावरणात प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात पाच एकर परिसरात उभारण्यात आलेल्या कलात्मक वीस हजार फूट भव्य साठ हजार फूट कलामंडपामध्ये षोडशकरण सोहळ्यास झाला .

 यावेळी सकाळी प पू निर्यापक श्रमण नियम सागर जी महाराज यांच्यासह पवित्र सागर जी महाराज , वृषभसागरजी महाराज , अभिनंदन सागरजी महाराज , सुपार्श्व सागरजी महाराज , प पू गणनी श्रुतमती माताजी , समनामती माताजी , शुल्लक संयमसागर जी आदि ची यावेळी प्रेरक उपस्थिती होती .

 भक्तीमय मंगलमय वातावरणात ' षोडशकरण सोहळ्यास ' प.पू नियमसागरजी महाराज यांचे प्रवचनाने प्रांरभ झाला . त्यांनी विनय संपन्नता विषयी हितगुजपर विवेचन केले . त्यानंतर सात्विक भोजनाने सकाळ च्या सत्राची सांगता झाली . सायंकाळ चा सत्रात ही यांच विषयावर प्रवचनात त्यांनी विवेचन केले . त्यानंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . आगामी दिवसात षोडशकरण सह .क्षमा - मार्दव - आर्जव - शौच - सत्य - संयम - तप - त्याग - आकिंचन्य - ब्रम्हचार्य या दशलक्षणा विविध पैलू नी त्यागी - व्यासंगी मुनीजन आपल्या अधिकार वाणी दारे विवेचन करणार आहेत . 


या भव्य कार्यक्रमासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेली तीन महिन्यांमध्ये अधिक काळ अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीय सचिन बहिर शेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले - ए के कामते - राजु शेठे , सचिन मिठारी, विशाल मिठारी, भूषण कावळे, वैभव कोगनुळे ,अमोल घोडके, अशोक बहिर शेठ, अवनीश जैन, सतीश पत्रावळे अनुपम भोजकर , अरुण तीर्थ, अमित बागे, सचिन पाटील, संजय टेंभुर्ले, यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्या समावेत कार्यरत आहेत . त्यांनी शहरासह सांगली - हुपरी - इचलकंरजी - कोडोली - वारणानगर - बाहुबली - आजरा - चंदगड आदीसह पन्नास हून अधिक गावात भेटी देवून प्रत्यक्ष भेटीसह आंमत्रणे दिली आहेत . या भव्य सोहळ्याच्या ठिकाणी आर के नगर - पाचगांव - कणेरी मार्गावरील सर्व केएमटी बसेस चा विनंती थांबा ही आसणार आहे , तरी या सोहळ्याचा सर्वानी लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकुंटुंब - सह परिवार भेट देऊन आध्यात्मिक अनुभव घ्यावा असे आहवान संयोजक प्रतिमा विघा प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे . सात्विक भोजन आणि आर्युवेद सह स्वदेशी वस्तुचे स्टॉल यांचे ही सुत्रबद्ध नियोजन करण्यात आले आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.