डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी करिता रु.५० लाखांचा निधी; आराखड्याचे सादरीकरण

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी करिता रु.५० लाखांचा निधी; आराखड्याचे सादरीकरण 

  


डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी युवकांना प्रेरणादायी ठरावी : श्री.राजेश क्षीरसागर


कोल्हापूर दि.१४ NewsDesk 

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ऐतिहासिक बिंदू चौकात अभिवादन करताना कोल्हापूरात डॉ. आंबेडकर यांच्या नावे भव्य ग्रंथालय आणि थीम पार्क उभारणार अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार तात्काळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये  प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत रु.५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, सदर निधी महानगरपलिका प्रशासनाकडे वर्गही करण्यात आला आहे. सदर डिजिटल लायब्ररीची उभारणी करताना विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणादायी ठरावी, अशा पद्धतीने डिजिटल लायब्ररीचे काम करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपलिका अधिकाऱ्यांना दिल्या.


            राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीच्या आराखड्याचे सादरीकरण आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले.


यावेळी माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, सदर लायब्ररी ही कोल्हापूर शहरातील आंबेडकर नगर, सदर बाजार येथील पंचशील भवन इमारतीच्या पहिल्या मजलावर २१ मीटर x १० मीटर इतक्या क्षेत्रामध्ये होणार आहे.  याकरिता रु.५० लाखाचा निधी मंजूर होऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे. सदर लायब्ररीमध्ये सर्व प्रकारची पुस्तके, फर्निचर, संगणक, डिजिटल पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठीची पुस्तके यासह ग्राउंड वर खेळणाऱ्या मुलांचा गोंगट चा आवाज आत येऊ नये याकरिता साऊंड प्रूफ ची व्यवस्था इत्यादी व्यवस्था ने डिजिटल लायब्ररी सुसज्ज असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची लायब्ररी कोठेही नाही.  तसेच सदर लायब्ररीचे वास्तव्य टिकून राहण्यासाठी सर्व क्षेत्रातील सदस्यांचे विश्वस्त मंडळ कार्यरत राहील. सदर च्या सुसज्ज  लायब्ररी मधून मार्गदर्शक सत्र आयोजित करुन, या मार्गदर्शक विचारांचा फायदा आपल्या लोकांना होऊ शकेल, या उद्देशाने सदर लायब्ररी स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.

यावेळी आंबेडकर चळवळीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली,  आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री उत्तम कांबळे म्हणाले,  कोल्हापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी साठी रु. ५० लाखाचा नीधी मंजूर केला हा ऐतिहासिक निर्णय आहे.  तसेच या आमच्या चळवळीमधील कोणीही एकट्याला हा विचार मनात आला नाही आणि शाहू नगरीत राहणारे श्री राजेश क्षीरसागर यांनी विध्यार्थ्यांची  गरज ओळखून सदर लायब्ररी विचार केला त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व आंबेडकर चळवळीच्या पक्षाच्यावतीने  श्री राजेश क्षीरसागर यांचे आभार मानले.  या जिल्ह्यात इतके मंत्री आणि आमदार झाले पण कोणालाही हे डिजिटल लायब्ररीचे सुचले नाही. आणि  सदर लायब्ररीचे उद्घाटन करतेवेळी राज्यातील आंबेडकर चळवळीचे सर्व प्रमुखांना बोलवूया जेणेकरून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये श्री.राजेश क्षीरसागर यांनी स्थापन केलेल्या डिजिटल लायब्ररीचे उदाहरण देऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारच्या लायब्ररीची मागणी करता येईल. सदर लायब्ररी चा अभ्यासासाठी  उपयोग करून  अनेक विद्यार्थी कलेक्टर, आयपीएस व इतर अधिकारी होऊ शकतील.  या डिजिटल लायब्ररीचे प्रसारण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि या लायब्ररी साठी प्रयत्न करणाऱ्या श्री.राजेश क्षीरसागर साहेबांचा सर्व आंबेडकरी चळवळींच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करणार असल्याचे सांगितले.    


    ब्लॅक पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष देसाई म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, गुलामाला गुलामाची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाचे व्यासपीठ हवे त्या पद्धतीने डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून शिक्षणाचे व्यासपीठ दिल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांचे आभार. तसेच १५० किलोमीटर दूर असलेल्या चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील ४०% लोकांनी अजून कोल्हापूर पाहिलेले नाही.  अशा लोकांसाठी चंदगड तालुक्यामध्ये अशा प्रकारची लायब्ररी व्हावी ही इच्छा व्यक्त केली.


            शिक्षक रामराव मांगोलीकर  म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू साध्य करण्यासाठी मदत केल्याबद्दल श्री राजेश क्षीरसागर यांचे आभार,  तसेच लायब्ररीतील वस्तूंची  जपणूक करण्यासाठी तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळण्यासाठी राबणारे  विश्वस्त मंडळ असावे अशा सूचना केल्या.

पीआरपी पक्षाचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव म्हणाले, सदर बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकर चळवळीतील समाज राहतो आपण घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून आपले सदरचे काम स्तुत्य आहे.


            या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाडगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव, तालुका अध्यक्ष करवीर बाळासाहेब वाशीकर, ब्लॅक पॅंथर संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, लोक जनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, आरपीआय उपजिल्हाध्यक्ष दत्ता मिसाळ, राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यासह आंबेडकरी चळवळीच्या विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.