गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना मनसेने दिला १२ तासात न्याय

 गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना मनसेने दिला १२ तासात न्याय




कोल्हापूर ६ प्रतिनिधी

खुपिरे,कोपार्डे,वाकरे,कुडित्रे,दोनवडे या गावांमध्ये गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.या गारपीटग्रस्तासाठी निधीही उपलब्ध झाला होता.पण त्या निधीचे वाटप अद्यापही झाले नव्हते.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ, शेतकऱ्यांसमवेत तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

         त्यावेळी महसूल व कृषी विभागाचा अनागोंदी कारभार दिसून आल्यावर शेतकऱ्यांचे कैवारी मनसेचे कोल्हापूर जिल्हा सचिव प्रसाद पाटील व नगरसेवक राजू दादा दिंडोर्ले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत *"जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.तोपर्यंत येथून जाणार नाही."* अशी भूमिका घेतली.

              यासंबधी करवीर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार , करवीर तहसीलदार अव्वल कारकून गुरुप्रसाद जाधव हे गेली सहा महीने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अक्षरक्ष फुटबॉल करत असल्याच्या निषेधार्थ यांना घेराव घालून प्रांत धार्मिक व उपजिल्हाधिकारी तेली यांचेशी संवाद साधून  महसूल सहाय्यक भरत पोळ, तलाठी सौ संध्या कुंभार, सौ श्रद्धा अंबपकर, कृषी सहाय्यक राहूल पाटील, मोईजाम मुल्ला या सर्वाना मनसे स्टाईलने एकत्रित काम करायला भाग पाडून अखेर सायंकाळी सात वाजता निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी संबंधित विभागाला आदेश दिल्याने रात्री अकरा वाजेपर्यंत कृषी व महसूल विभागास संयुक्त काम करायला लावल्याने सर्व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली.

           यामुळे कोल्हापूर पश्चिम भागातील करवीर,पन्हाळा परिसरातील लोकांना याचा लाभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

               यावेळी शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, विभाग अध्यक्ष शरद जाधव,विक्रम नरके,अमित बंगे,कृष्णात कांबळे, अरविंद कांबळे, कोपार्डे चे तुकाराम पाटील,(हुजरे),विष्णू पाटील (हुजरे),युवराज पाटील,नवनाथ पाटील,बाळासो साळुंखे,तानाजी पाटील,अनिल पाटील,बापट पाटील,अभिजीत पाटील यांच्या सह अन्य गारपीट ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

             गेली चार महिने नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 12 तासांमध्ये मनसे कोल्हापूरच्या दणक्याने फक्त 12 तासांमध्ये खात्यावरती रक्कम झाली ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरमुळेच अशा पद्धतीच्या भावना शेतकऱ्यांमधून बोलल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.