भगिनी महोत्सव २०१९

*भारतीय संस्कृती जपण्याचे काम भगिनी महोत्सवाने केले : महापौर सौ. सरिता मोरे*
*महिला सबलीकरणासाठी भगिनींच्या पाठीशी ठाम उभे राहू : आमदार राजेश क्षीरसागर*
*भगिनी मंच आयोजित भगिनी महोत्सवाचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न*
कोल्हापूर दि. १० : गेल्या आठ वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ९ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१९” चे भव्य आयोजन “प्रायव्हेटहायस्कूल मैदान” मंगळवार पेठ कोल्हापूर येथे दि. १० ते १२ मे दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा कोल्हापूरच्या महापौर सौ. सरिता मोरे यांच्या शुभहस्ते आमदार राजेश क्षीरसागर, भगिनी मंच अध्यक्षा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्ष सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
            या महोत्सवाकरिता प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगिनी महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ठ असलेल्या बचत गटांच्या स्टॉलची मांडणी, भव्य स्टेज, स्वागत कमानी आदीद्वारे भगिनी महोत्सवाची जय्यत तयारी करणेत आली आहे. 
            सकाळी उद्घाटन समारंभ प्रसंगी देवल क्लब ते प्रायव्हेट हायस्कूल पर्यंत झांज पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक पार पडली यानंतर प्रायव्हेट हायस्कूल येथे महापौर सौ.सरिता मोरे, भगिनी मंच अध्यक्षा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्ष सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगिनी मंचचा लोगो भगव्या फुग्यांसह हवेत सोडण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यासह फीत कापून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “स्त्री एकजुटीचा विजय असो” , अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
            कार्यक्रम स्थळावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मा. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
            कार्यक्रमाच्या सुरवातीस भगिनी मंचचे घटक असलेले जेष्ठ सिने दिग्दर्शक कै.यशवंत भालकर यांच्या श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
               यावेळी मनोगत व्यक्त करताना भगिनी मंच अध्यक्षा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्ष सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, भगिनी महोत्सवाचे हे यशस्वी ९ वे वर्ष असल्याचे नमूद करीत भगिनी मंचच्या स्थापनेचा मूळ उद्देश करवीर नगरीतील बचत गटांना बळकटी मिळवून देणे हा असल्याचे सांगितले. गेल्या ९ वर्षापूर्वी या करवीर नगरीत भगिनी मंचच्या माध्यमातून लावलेल्या लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांना उपलभ करून दिलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाकरिता कार्यरत राहण्याची ग्वाही देत भगिनी मंचद्वारे काम सुरु आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा आनंद शहरातील सर्वच भगिनींनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
               यानंतर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, बचत गटांना बळकटी मिळावी यासाठी सलग ९ वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. निवडणुकीपुरते काहीजन कार्यक्रम घेतात पण महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी गेली ९ वर्षे अविरतपणे हा महोत्सव आम्ही करीत आहोत. यासह महिलांच्या रक्षणाकरिता १००० मोफत हेल्मेट वाटप, रिक्षा व्यावसायिकांना मोफत ई मीटर वाटप असे सामाजिक उपक्रम असोत वा टोल, एलबीटी सारखे आंदोलने असोत शिवसेना कायम जनतेसोबत राहिली आहे. यासह विविध विकासकामे, श्रावणव्रतवैकल्य, ढोल स्पर्धा आदीतून सतत नागरिकांच्या सेवेत आम्ही आहोत. शहरावर चालून आलेल्या आपत्तीस रोखण्यासाठी आपण नेहमीच रस्त्यावर उतरत असून, विरोधकांच्या बदनामीला मी भीत नाही. आमचे काम लोकांच्या मनात रुजले आहे. त्याचमुळे स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावर विजयाची हॅट्रीक करून दाखवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            यानंतर बोलताना महापौर सौ. सरिता मोरे यांनी, महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भगिनी मंचने उपलब्ध केलेल्या व्यासपिठाबद्दल भगिनी मंचचे अभिनंदन करताना प्रत्तेक क्षेत्रात महिला पुढे येत असून, अशा पद्धतीचे व्यासपीठ महिलांना उपलब्ध होत असेल तर महिलांनी त्याचा फायदा घेऊन समाजात उन्नती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. भगिनी महोत्सव हा कोल्हापूरचा महोत्सव बनला असून, दरवर्षी आगळा वेगळा कार्यक्रम शहरवासियांना अनुभवता येतो. त्याचमुळे शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम बनला असून, महिलांसाठी हि मनोरंजनाची मेजवानी आहे. भारतीय संस्कृती जपण्याचे काम या महोत्सवाने केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
यानंतर कोल्हापूरच्या महापौर सौ. सरिता मोरे आणि मान्यवरांच्या यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थिती १०० भगिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ. सुजाता पेंडसे, श्रीमती जयश्री दानवे, डॉ.प्रांजली धामणे, डॉ.प्रियदर्शनी चोरगे, प्रा.हेमलता पाटील, सौ.मंगलताई कुलकर्णी, डॉ.सुनीती गोपाळकर, डॉ.कविता जोगी, श्रीमती प्रेरणा इनामदार आदींचे सत्कार करण्यात आले. यावेळी  उपमहापौर भूपाल शेटे व युवानेते ऋतुराज क्षीरसागर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्तींच्या वतीने अॅड. शिल्पा राजेश सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
            यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, नगरसेवक नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले, नगरसेविका सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, दीपक गौड, जयवंत हरुगले, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, अमर सर्मथ, सौ. मंगल साळोखे, सौ.पूजा भोर आदी मान्यवर उपस्थित होते.


*शनिवार दि. ११ मे रोजी कॉमेडी किंगकुशाल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांच्या कॉमेडी ट्रेनसह अनेक सिनेकलाकारांचा कॉमेडीचा धूमधडाका*
भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि.११ मे २०१९ रोजी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेमध्ये अनेक टीव्ही कलाकारांच्या “भगिनी कोल्हापूरची” या महिलांच्या स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले असून, विविध खेळातून सरस ठरणाऱ्या १० भगिनीमध्ये अंतिम फेरी साठी पात्र ठरणार असून सर्वात सरस असणारी भगिनी “भगिनी कोल्हापूरची २०१९” च्या आकर्षक बक्षिसाची मानकरी ठरणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे एल.सी.डी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओवन, फ्रूड प्रोसेसर अशी भरगोस बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सहा ते दहा क्रमांकाच्या स्पर्धकांनाही आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. यानंतर गेली आठ वर्षे कोल्हापुरातील महिला आणि युवतींनी भरभरून सहभाग दिलेल्या आणि ज्याचे कोल्हापूरवासियांना आतुरता असते अशा  “मिस भगिनी आणि मिसेस भगिनी २०१९” या महिला आणि युवतींच्या सौंदर्य स्पर्धेचे सायं ५.०० ते ७.०० या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या स्पर्धकावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. स्पर्धेतीलविजेत्या मिस आणि मिसेस भगिनीला “मिस/ मिसेस भगिनी २०१९” चा किताब, सुवर्ण मुकुट आणि प्रथम क्रमांकाचे एल.सी.डी, टीव्ही हे बक्षीस देनेत येणार आहे. त्याच बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्या स्पर्धकास  अनुक्रमे फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मुकुट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  यानंतर चला हवा येऊ द्या फेम कॉमेडी किंग कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांची कॉमेडीची जुगलबंदी पहावयास मिळणार आहे. यासह हिरवं कुंकू फेम अभिनेत्री व नृत्यांगना तेजा देवकर, ढोलकीच्या तालावर फेम दिपाली सय्यद, सिने अभिनेत्री रेशम टिपणीस, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेता पुष्कर जोग, हिंदी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणारे गायक रोहित राऊत, प्रसिद्ध मराठी गायिका मधुर कुंभार या सिने कलाकारांनाचे लाइव्ह परफोर्मंन्स पाहण्याची संधी कोल्हापूर वासियांना मिळणार असून, या स्टारकास्टनी भरलेल्या“धूमधडाका” या गायिकी, विनोद आणि नृत्य या तिन्हीची सांगड घालणाऱ्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सायंकाळी ७.०० वाजता आयोजनकरण्यात आले असून, या कलाकारांच्या व तारकांच्या दिलखेचक अदाकारीची मेजावाजीच रसिकांना मिळणार आहे.

         




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.