डॉ. मगदूम अभियांत्रिकीच्या पाच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
कोल्हापूर ०४ अविनाश शेलार
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सिव्हिल विभागातील पाच विद्यार्थ्यांची पुणे येथील एस. जे. कॉन्ट्रॅक्ट प्रा. लि. या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री. सौरभ खानावळे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. सानिया शेख, साक्षी चौगुले, सायली पाटील, शर्वरी पाटील आणि प्रथमेश पाटील यांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या या कंपनीकडून निवासी, व्यावसायिक इमारती तसेच औद्योगिक प्रकल्पांवर विविध प्रकारची सिव्हिल कामे केली जातात.
या यशाबद्दल ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील तसेच डॉ. जे. एस. लंबे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख व सिव्हिल विभागातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



