एच टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचे कोल्हापुरात आयोजन

  ब्राह्मण सभा करवीर पुरस्कृत ॲडव्होकेट पी आर मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचे कोल्हापुरात आयोजन



कोल्हापूर १४ (अविनाश काटे)

 ब्राह्मण सभा करवीर पुरस्कृत ॲडव्होकेट पी.आर. मुंडरगी स्मृती एच् टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिराजवळ, कोल्हापूर  येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. 



 जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा स्विस् लिग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. या स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड  येथे दिनांक तीन ते नऊ सप्टेंबर दरम्यान गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तेरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये मुले आणि मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या दहा क्रमांक विजेत्यांना एकूण अठरा  हजार प्रमाणे दोन्ही गटात मिळून एकूण छत्तीस  हजार रूपयांची रोख आणी चषक व मेडल्स बक्षीसे म्हणून ठेवले आहे. दोन्ही गटातील  विजेत्याला रोख चार हजार व चषक उपविजेत्याला रोख अडीच हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 7 9 व 11 वर्षाखालील प्रत्येक गटात तीन असे एकूण 18 चषक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

01/01/2012 ला किंवा त्यानंतर जन्मलेले फक्त महाराष्ट्रातील मुले व मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूस एक हजार रुपये व निवड न झालेल्या बुद्धिबळपटूस दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत  संकेतस्थळावर प्रवेश फीसह नावनोंदणी करावयाची आहे‌.

ही स्पर्धा ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ने ॲडव्होकेट पी.आर्.मुंडरगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲडव्होकेट अशोक मुंडरगी यांच्या सहकार्याने प्रायोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळाविकर यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने मुख्य पंच म्हणून  नियुक्ती केली आहे.

या स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या होणार असल्याने महाराष्ट्रातील तेरा वर्षाखालील गटातील बुद्धिबळपटूना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळण्यासाठी व वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.विशेषकरून स्थानिक कोल्हापूर जिल्हातील व शेजारील सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिबळपटू ना सुवर्णसंधीच आहे.

वरील माहिती चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉक्टर दिपक आंबर्डेकर  कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी   चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे, प्रितम घोडके,अनिश गांधी, आरती मोदी व प्रशांत पिसे उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.