मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा महा रक्तदान संकल्प

 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा महा रक्तदान संकल्प



कोल्हापूर २१ (प्रमोद पाटील)

महाराष्ट्र राज्याचे लाडके व यशस्वी मुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा उद्या दिनांक 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे.


याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाजपा कोल्हापूर महानगर च्या वतीने शहरातील नऊ मंडलांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत.

यामध्ये सेवा रुग्णालय कसबा बावडा, नेहरूनगर सोसायटी हॉल नेहरूनगर कोल्हापूर, राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी तिसरी गल्ली, दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ कोल्हापूर, शिवाजी तरुण मंडळ हॉल शिवाजी पेठ कोल्हापूर, शिव मल्हार मल्टीपर्पज हॉल खोल खंडोबा मंदिर, कै महादेवराव जाधव वाचनालय पंजाब नॅशनल बँक नजीक टाकाळा, संयुक्त बालावधूत मित्र मंडळ नाना पाटील नगर कोल्हापूर याठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.