‘रिलायन्स’ व ‘जिओ’चा बनावट ट्रेडमार्क वापरलेली उत्पादने विकणे थांबवा – दिल्ली उच्च न्यायालयाचा अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टला आदेश

 ‘रिलायन्स’ व ‘जिओ’चा बनावट ट्रेडमार्क वापरलेली उत्पादने विकणे थांबवा – दिल्ली उच्च न्यायालयाचा अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टला आदेश




अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दिली उच्च न्यायालयाने चपराक 

• अनधिकृत ट्रेडमार्क वापरून ग्राहकांची फसवणूक – रिलायन्स


कोल्हापूर १५ प्रमोद पाटील 
दिल्ली उच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना ‘रिलायन्स’ आणि ‘जिओ’ या ट्रेडमार्कचा उल्लंघन करणारी उत्पादने विक्रीस आणण्यास थेट मनाई केली आहे. न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, या ट्रेडमार्कचा उल्लंघन करणाऱ्या सर्व उत्पादनांचे उत्पादन आणि जाहिरात दोन्ही तात्काळ थांबवण्यात यावे.



खरेतर, काही ई-कॉमर्स वेबसाइट्सवर रिलायन्स आणि जिओ यांच्या नावाशी साधर्म्य असलेले ब्रँड नावे आणि लोगो वापरून उत्पादने विकली जात होती. यामार्फत कंपन्या रिलायन्स आणि जिओ यांच्या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेत ग्राहकांची दिशाभूल करत होत्या. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, “जी उत्पादने रिलायन्स किंवा जिओने बनवलेली नाहीत, ती त्यांच्या नावाने विकणे कायदेशीर नाही.”



न्यायालयाने रिलायन्सच्या बाजूने युक्तिवाद मान्य करत सांगितले की, “ऑनलाइन किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना ग्राहक उत्पादनांची ओळख ब्रँड नाव आणि कंपनीच्या लोगोवरून करतात. अशा परिस्थितीत जर भ्रम निर्माण झाला, तर त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या सुरक्षिततेवर होतो.”



या प्रकरणात रिलायन्सने दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले होते की, काही विक्रेते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर रिलायन्सच्या ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करून फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) विक्री करत आहेत. यामध्ये ना केवळ बेकायदेशीर व्यापार होतो आहे, तर सर्वसामान्य ग्राहकांनाही दिशाभूल करून फसवले जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.