अखिल भारत हिंदू महासभा तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

 


 अखिल भारत हिंदू महासभा तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा



कोल्हापूर ०९ (अविनाश शेलार)

कोल्हापूर मधील अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा कार्यालय मार्फत  ताराबाई रोड सावरकर चौक  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ वाशिवराज्याभिषेकदिना निमित्त  आ  भा हिंदू महासभा जिल्हा कार्यालय मार्फत 351 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला पहाटे सावरकर चौकात सडा रांगोळ्या काढून महिलांनी  पंचारती सहित  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला  औक्षण करून   भागातील प्रतिष्ठित नागरिक सुरज मोरे यांनी पुष्पहार अर्पण  केला  यावेळी सावरकर चौकात प्रथमता आतिषबाजी झाली  त्यानंतर साखरपेढे वाटप करण्यात आले

या सोहळ्यासाठी अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने  महिला जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई रजपूत सौ सुवर्णाताई सुतार सौ ज्योतीताई बागडी सौ. शोभाताई शेलार -  पाटील  प्रतिष्ठित नागरिक संजय पाटील मालोजी केरकर  सुनील मोरे तसेच विनोद बागडी  

विजय बुचडे ,जितेंद्र चव्हाण, महेश गंडमाळे, तेजस सासने मालोजी केरकर आधी महिला आणि  कार्यकर्ते  मोठ्या  संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.