उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आदमापूर येथील श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थानाला दिली भेट
.
कोल्हापूर २३ प्रमोद पाटील
आज (दि. २३) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आदमापूर येथील श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थानाला भेट दिली. बाळूमामांच्या समाधीचं श्रद्धेनं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं पारंपरिक रीतीनं काठी आणि घोंगडी देऊन स्वागत केलं. मंदिर परिसरातील चालू आणि नियोजित विकासकामांची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी घेतली







