हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी व श्रमिक सेवा संस्था यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी व श्रमिक सेवा संस्था यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी




कोल्हापूर ३ अविनाश शेलार 


मंगळवार पेठ कोल्हापूर प्रधान कार्यालय मध्ये   साजरी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली  महिलांना  त्यावेळी संघटनेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेऊन महिलांना शिक्षण मिळावे त्यासाठी झालेला छळ व शिक्षणासाठी त्यांची धडपड व महिला स्वावलंबी व्हाव्या यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न त्याला यश आले व त्यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व समजून दिले त्यासाठी त्यांना चिखल फेकही झाली व दगडफेकही झाली तरीही त्या डगमगल्या नाहीत अशा या सावित्रीबाई फुले यांचा विचार मांडून महिलांच्या असणाऱ्या कला त्यांना त्या कलेतून रोजगार उपलब्ध करून देणे व महिला सबलीकरणासाठी एक पाऊल पुढे केलेआहे. तर या महिलांनी ठुशी प्रशिक्षण देऊन  आपल्या संसाराला कसा हातभार लावता येईल व मुलांना शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत अशी या महिलांची धडपड पाहून अध्यक्षा  सौ निर्मला प्रमोद कुऱ्हाडे यांनी धाडसाने एक पाऊल पुढे घेऊन त्यांना प्रत्येक कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या साठी ठुशीचे ट्रेनिंग घेऊन घरी माल सुद्धा त्यांना देण्यात आला आहे त्यावेळी सोनाली जाधव सुप्रिया पाटील यांनी प्रशिक्षण महिलांना दिले व अंकित गवळी शोभा पाटील श्रुती मिरजकर नदा फ भाभी अंकिता चिले प्रियंका पाटील बावडा व मंगळवार पेठेतील महिलांनी सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.