भाजपा सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 भाजपा सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद



कोल्हापूर दि 5 प्रमोद पाटील 

संपूर्ण देशभरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष ते बूथ कार्यकर्ता या अभियानात सहभागी होत आहे. सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने महा सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. शहराच्या सात मंडलात या अभियानाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. 

भाजपा आमदार अमल महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात तर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश महिला उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात प्रवास करत नागरिकांना भाजपा सदस्य होण्याचे आवाहन करत या अभियानात सक्रिय सहभाग दर्शवला.

भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांनी आज दिवसभरात आपल्या बूथ मधील नागरिकांची नोंदणी करण्यासाठी घरटूघर संपर्क साधला.


भाजपाचे हे सदस्यता नोंदणी अभियान 15 जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून 8800002024 या नंबर वर मिस कॉल द्वारे भाजपा सदस्य नोंदणी करता येणार आहे. 


देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेची पसंती कायम असून देश सुरक्षित राहण्याची भावना या अभियानाच्या माध्यमातून अनेक लोकांनी व्यक्त केली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.