हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन 




 शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल : जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण 



 

कोल्हापूर दि.२३ सिटी न्यूज नेटवर्क 

 राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या विचारांची शिदोरी आम्हा शिवसैनिकांसोबत असून, त्यानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरु आहे,  असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, रणजीत मंडलिक, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, राजू पाटील, अर्जुन आंबी, अशोक राबाडे, विजय देसाई, अंकुश निपाणीकर, सुरेश माने, किरण पाटील, शंभू मोरे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.