भूपाल शेटे, सुहास कारेकर, आदित्य म्हमाने यांचा 19 जानेवारीला जाहीर नागरी सत्कार



भूपाल शेटे, सुहास कारेकर, आदित्य म्हमाने यांचा 19 जानेवारीला जाहीर नागरी सत्कार



स्केटिंग : मृत्यूला भिडणारी गोष्ट लघुपटाचा प्रिमीअर शो


कोल्हापूर १४ प्रमोद पाटील 

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी उपमहापौर, एस. के. रोलिंग अकॅडमीचे अध्यक्ष भूपाल शेटे, एस. के. रोलिंग अकॅडमीचे सचिव आणि स्केटिंगचे मार्गदर्शक सुहास कारेकर आणि बालकलाकार आदित्य म्हमाने यांचा सिने अभिनेते संजय मोहिते, कला शिक्षिक सागर बगाडे, सामाजिक कार्यकर्ते अब्राहमबापू आवळे, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार रविवार दि. 19 जानेवारी रोजी दुपारी 12:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणार असून यावेळी निर्मिती फिल्म क्लब निर्मित स्केटिंग : मृत्यूला भिडणारी गोष्ट या लघुपटाचा प्रिमीअर शो होणार असल्याची माहिती लघुपटाच्या क्रिएटिव्ह हेड ॲड. करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्केटिंग : मृत्यूला भिडणाऱ्या संवेदनशील मुलाची गोष्ट असून या लघुपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, सहनिर्माता विश्वासराव तरटे, सिकंदर तामगावे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अर्हंत मिणचेकर, अंतिमा कोल्हापूरकर यांचे तर डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे यांनी काम पाहिले आहे.

कथा व संवाद अनिल म्हमाने यांचे असून सुहास कारेकर, भूपाल शेटे, आदित्य म्हमाने, अंतिमा कोल्हापूरकर, सतेज औंधकर, राहुल जगताप, विश्वासराव तरटे, वंदना धनवडे, मंथन जगताप, नमिता धनवडे, दिक्षा तरटे, तक्ष उराडे, भूमी पासवान, प्रज्ञा पाटोळे, कृष्णा नेताले, सार्थक गावडे, अदिराज अथने यांच्यासह पन्नासहून अधिक खेळाडूंनी यात काम केले आहे.

स्केटिंग हा भारतीय खेळामधील एक महत्त्वाचा खेळ असून एस. के. रोलिंग अकॅडमीच्यावतीने या खेळामध्ये अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल या अकॅडमीचे अध्यक्ष भूपाल शेटे व सचिव सुहास कारेकर यांचा त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच भरीव योगदान देणाऱ्या व दहाहून अधिक लघुपटात मुख्य भूमिका साकारून कलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला कोल्हापूरचा बाल कलाकार आदित्य म्हमाने यांचा जाहीर नागरी सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, अर्हंत मिणचेकर, अंतिमा कोल्हापूरकर, सिद्धांत कांबळे, नीती उराडे, दीक्षा तरटे, भूमि पासवान उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.